तीन दिवसांत मुंबईत डेंग्यूचे सात रुग्ण

जुलै महिन्यातही पावसाळी आजारांच्या विळख्यात मुंबईत डेंग्यू, मलेरिया आणि गॅस्ट्रोचे रुग्ण आढळून येत आहे. पहिल्या तीन दिवसांतच डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या पाहणीत दिसून आले. तीन दिवसांतच गॅस्ट्रोचे ४०, मलेरियाचे ३९ आणि डेंग्यूचे ७ रुग्ण आढळले. येत्या आठवड्याभरात मुंबईत लेप्टोचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दोन दिवस मुंबईत ठिकठिकाणी पाणी भरल्याने आता लेप्टोचे रुग्ण वाढतील, अशी भीती आरोग्य विभागातील अधिका-यांनी व्यक्त केली.

गॅस्ट्रो, मलेरिया रुग्णांमध्येही वाढ

मुंबईत जून अखेरिस मुसळधार पावसाला सुरुवात झाली असली तरीही डेंग्यूचे रुग्ण सतत वाढत आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या तीन दिवसांतच मुंबईत ७ डेंग्यूचे रुग्ण आढळले. मुंबईकरांची सर्वात जास्त तक्रार गॅस्ट्रोची लागण झाल्याने होत असून, जुलै महिन्यातही ४० रुग्णांना गॅस्ट्रोची बाधा झाल्याचे पालिका आरोग्य विभागाच्या पाहणीतून दिसून आले. तीन दिवसांत मलेरियाचे ३९ रुग्ण सापडले. जूनपासून मुंबईत आतापर्यंत गॅस्ट्रोचे २ हजार ९४६, मलेरियाचे १ हजार २८२, हेपेटायटीसचे २५९, डेंग्यूचे १३० रुग्ण दिसून आले आहेत. जूनपासून लेप्टोचे ३५ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहेत.

(हेही वाचा पावसामुळे मुंबईत दशकभरातील सर्वात कमी कमाल तापमानाची नोंद)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here