राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्तीसाठी (Pt. Bhimsen Joshi Youth Scholarship) सात विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांना डिसेंबर २०२३ पर्यंत एका वर्षासाठी दरमहा पाच हजार रूपये शिष्यवृत्ती मिळणार आहे.
यावर्षी चैतन्य परब – शास्त्रीय संगीत, पवन झोडगे – पखवाज, पवन सिडाम – तबला, पार्थ भुमकर – पखवाज, जगमित्र लिंगाडे – तबला, सुर्यकांत शिंदे – पखवाज व यश खडके – हार्मोनियम या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
(हेही वाचा – Hair : लांब, काळे केसांसाठी मेथीचे दाणे ठरतात वरदान)
शास्त्रीय संगीताला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. योजनेत विविध चार उपक्रम राबविले जात असून त्यापैकीच एक हा उपक्रम आहे. दोन वर्षासाठी शिष्यवृत्ती मिळते. शासनाची तज्ञ समिती सहा गायन व सहा वादन क्षेत्रातील गरजू विद्यार्थ्यांची या शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. शासनाच्या तज्ञ समितीकडून गायन आणि वादन क्षेत्रातील विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community