मुंबईत गोवरचे ७ संशयित मृत्यू

मुंबईत गोवरच्या वाढत्या साथीमुळे आतापर्यंत 7 मृत्यू झाले आहेत. यातील सहा मृत्यू गोवंडीत आणि एक पायधूनीत झाला आहे. त्यापैकी चार मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात झाल्याची खात्रीलायक बातमी आहे. सध्या रुग्णालयात 60 रुग्णांना उपचार दिले जात आहे. 7 संशयित मृत्यूंबाबत, मृत्यू छाननी समितीकडून अहवाल आल्यानंतर स्पष्ट कल्पना येईल, अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

( हेही वाचा : हिवाळी अधिवेशनात ‘बारकोड’ पद्धतीचा अवलंब करणार – राहुल नार्वेकर)

कस्तुरबा रुग्णालयात काल आणि परवा दोन मृत्यू झाले आहेत. अजून एक मृत्यू कधी झाला, त्याबाबतची माहिती मिळाली नाही. दोन रुग्ण सध्या कृत्रिम श्वासोच्छवासावर उपचार घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. गोवरबाधित रुग्णांना वॉर्ड क्रमांक 26 मध्ये उपचार दिले जात आहेत. मुंबईत गोवरबाधित रुग्णांना सध्या एन्टीबायोटीक औषधे दिली जात आहेत. लहान मुलांच्या उपचारामध्ये जास्त पॉवरची औषधे देता येत नाही त्यामुळे एन्टीबायोटीक हेच सध्या प्रभावशाली उपचार पद्धती असल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here