पुणे शहरात नव्याने रेशन कार्ड हवे असल्यास ते आता ऑनलाईन आणि नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानुसार, गेल्या चार महिन्यांत सुमारे ७ हजार ५५७ जणांनी ई-रेशनकार्डचा (E-Ration Card) लाभ घेतला आहे, मात्र ज्या रेशनकार्डधारकांना ई-रेशनकार्डविषयी काहीच माहिती नाही, त्यांना अजूनही एजंटांचा विळखा कायम असून त्यांची आर्थिक लूट होत आहे.
रेशन कार्ड काढण्यासाठी एजंटांना हाताशी धरावे लागते. अनेक तहसील कार्यालयांमध्ये तसेच परिमंडळ कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट झाला होता. यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचादेखील समावेश आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना २० रुपयांत मिळणारे रेशन कार्ड काढण्यासाठी २ हजार रुपये मोजावे लागतात. याला आळा बसण्यासाठी राज्य सरकारने १७ मेपासून ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्ड काढण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
(हेही वाचा – Ganeshotsav 2023 : मुंबईतील ३७६ मंडळांचे अर्ज नाकारले, यंदा २,७२९ मंडळांच्या मंडपांना परवानगी )
ई-रेशन कार्ड मोफत उपलब्ध
पुणे शहरातील नव्याने कार्ड काढणाऱ्या नागरिकांना आता ऑनलाईनच अर्थात ई-रेशन कार्डच घ्यावे लागते. यासाठी संकेतस्थळावरून किंवा रेशन दुकानांमधून तसेच विभागीय कार्यालयांमध्ये क्यूआर कोड उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर पुढील प्रक्रियेनंतर रेशनकार्डसाठी अर्ज पूर्ण होतो. त्यानंतर हा अर्ज पडताळणीसाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे येतो त्यानंतर ई-रेशनकार्डकरिता मान्यता दिली जाते.
हेही पहा –