Mumbai तील 70 टक्के आगी इमारतींमध्ये असलेल्या सदोष विद्युत कामांमुळे

223
Mumbai तील 70 टक्के आगी इमारतींमध्ये असलेल्या सदोष विद्युत कामांमुळे
Mumbai तील 70 टक्के आगी इमारतींमध्ये असलेल्या सदोष विद्युत कामांमुळे

मुंबईतील (Mumbai) कमला मिल कंपाउंडमध्ये असलेल्या एका 15 मजली इमारतीमध्ये 6 सप्टेंबर रोजी आग लागली व अलीकडच्या वर्षांमध्ये ही ह्या भागातली अशी आगीची तिसरी घटना होती. कोणालाही दुखापत झाली नसल्याचे समोर आले, तरी ह्या आगीने 7 व्या ते 10 व्या मजल्यांवरील कार्यालयांच्या जागेचे नुकसान केले. इमारतीच्या काचेच्या संरचनेमुळे आत धूर कोंडला गेल्यामुळे अग्नी शमन करणा-यांसमोर आव्हान निर्माण झाले होते. इमारतीच्या कार्यरत अग्नी शमन प्रणालींनी ज्वाळांना नियंत्रणात आणण्यासाठी मदत केली. काचेच्या इमारतींच्या सुरक्षा नियमनांसंदर्भात ह्या घटनेमुळे नव्याने प्रश्न उपस्थित झाले आहेत व कठोर निगराणी व सुधारित उपकरणे हवीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण निश्चित करण्यासाठी चौकशी केली जात आहे.

(हेही वाचा – Pimpri Chinchwad मध्ये कोसळली पाण्याची मोठी टाकी; ५ कामगारांचा मृत्यू)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ह्यांनी 3 जुलै 2024 रोजी राज्य विधान परिषदेमध्ये सांगितले की, गेल्या तीन वर्षांमध्ये मुंबईमध्ये आगीच्या 13,000 घटना घडल्या आहेत व त्यामध्ये दुर्दैवाने 65 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. ह्या संकटाचा इशारा देणा-या आकडेवारीमध्ये शहरामध्ये आगीपासून सुधारित सुरक्षा उपाय व इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुधारणा करण्याची तातडीची गरज समोर येत आहे व त्यामुळे भविष्यात आगीच्या दुर्घटना टाळल्या जाऊ शकतील व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री घेतली जाऊ शकेल.

भारतीय अग्नी व सुरक्षा परिषदेचे (एफएसएआय) अध्यक्ष सचिव व आंतरराष्ट्रीय विषयाच्या अध्यासनाचे प्रमुख अजित राघवन ह्यांनी म्हंटले, “विशेषत: मुंबईसारख्या अतिशय दाटीवाटीच्या शहरी क्षेत्रामध्ये विजेच्या वायर्स जीवन व मालमत्तेला गंभीर धोका ठरू शकतात. कमी दर्जाच्या विजेच्या साहित्याचा मोठ्या प्रमाणात वापर असल्यामुळे व विजेच्या व अग्नी शमनाच्या प्रणालींची पुरेशी देखभाल नसल्यामुळे हे एक फार धोक्याचे कारण ठरू शकते. शॉर्ट सर्किटस होऊ नये व आपल्या इमारती सुरक्षित राहाव्यात म्हणून आपण उच्च गुणवत्तेच्या व अग्नी विरोधी तांब्याच्या सुवाहक सारख्या साहित्याचा वापर करण्यास प्राधान्य देणे अतिशय गरजेचे आहे. तसेच लोकांनी नियमित अग्नी शमन प्रणालीची तपासणी व योग्य विद्युत साहित्य बसवण्याच्या पद्धती ह्यांबद्दलही जागरूक असले पाहिजे व त्यामुळे भविष्यात अशा दुर्घटना टाळता येतील.”

डिसेंबर 2023 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) बीएमसीला (BMC) आगीचे उपाय, प्रमाणित संचालन प्रक्रिया (एसओपी), अग्नी शमन केंद्रांची संख्या, कर्मचारी, प्रतिसाद अवधी ह्या तपशीलांसह शपथपत्र सादर करण्याचा आदेश दिला होता. बीएमसीच्या सांगण्यानुसार आधीच्या सर्वेक्षणामध्ये 278 इमारतींमध्ये दोष आढळला होता व तो दुरुस्त करण्यात आला होता. अधिक उंचीच्या इमारतींमधील अग्नी सुरक्षा उपायांमध्ये सुदारणा करण्यासाठी शिंदे ह्यांनी 70 मीटर्सपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींमध्ये आगीच्या स्थितीमध्ये इव्हॅक्युएशन एलेव्हेटर्स बसवण्याची गरज परत एकदा अधोरेखित केली आहे.

अतिशय दाट लोकवस्तीच्या मुंबईमध्ये 70 ते 80 टक्के इतक्या मोठ्या प्रमाणातील आगीच्या घटना ह्या इलेक्ट्रिकल शॉर्ट सर्किटसमुळे झाल्या आहेत. अनेक वेळेस, विशेषत: जास्त उंचीच्या इमारतींच्या बाबतीत, अनेकदा कमी देखभाल असल्यामुळे काम न करणा-या अग्नी शमन उपकरणामुळे हानीचे प्रमाण आणखी वाढले. कठोर उरक्षा उपाय व विद्युत प्रणालींना व अग्नी शमन उपकरणाला नियमित प्रकारे तपासण्याची तातडीची गरज ह्यामधून दिसते व ह्याद्वारे अशा घटना टाळता येऊ शकतील व त्यांचा परिणाम कमीत कमी करता येईल.

विजेच्या आगींसंदर्भात कारणीभूत ठरणारा एक महत्त्वाचा घटक हा कमी दर्जाच्या वायर्स व केबलचा सर्वत्र केला जाणारा वापर हे आहे व ह्या वायर्स नएकदा कमी दर्जाच्या वाहक पदार्थापासून बनलेल्या असतात व त्यामुळे शॉर्ट सर्किट व आग लागण्याची जोखीम वाढते. सार्वजनिक सुरक्षिततेची खात्री घेण्यासाठी ग्राहकांनी उच्च गुणवत्तेच्या विद्युत घटकांना प्राधान्य देण्याची, विशेषत: तांब्याच्या सुवाहकाला प्राधान्य देण्याची गरज आहे, कारण त्यामध्ये आगीला विरोध करण्याची अधिक चांगली क्षमता असते.

सरकारी यंत्रणा व आघाडीच्या बांधकाम कंपन्या वाढत्या प्रमाणात बीआयएस- मार्क असलेल्या ईटीपी ग्रेडच्या तांब्याच्या वायर्स व केबल्सच्याच संपूर्ण वापराचे व त्यासह सुरक्षा मानकांच्या अनुपालनाच्या खात्रीसाठि नियमित तपासणीचे समर्थन करत आहेत. ह्या उच्च दर्जाच्या साहित्यामध्ये गुंतवणूक करून विजेमुळे लागणा-या आगीची जोखीम मोठ्या प्रमाणात कमी होईल व जीव व मालमत्तेचे संरक्षण करता येईल. तसेच, कमी दर्जाच्या विद्युत उत्पादनांमधील धोके व सुरक्षित इन्स्टॉलेशन पद्धतींचे महत्त्व ह्याबद्दल ग्राहकांचे प्रबोधन करण्यासाठी सार्वजनिक जागरूकता अभियानसुद्धा महत्त्वाचे आहे.

यंत्रणांचे म्हणणे आहे की, कमी दर्जाच्या सामग्रीने खर्च कमी केल्यामुळे अपघातांचीच शक्यता वाढते असे नाही तर दीर्घ काळामध्ये जास्त खर्चही करावा लागतो. उच्च गुणवत्तेच्या विद्युत साधनांच्या वापराद्वारे सुरक्षिततेला प्राधान्य देणे व त्यासह सर्व इमारतींमध्ये योग्य संरक्षक उपकरणे व विश्वसनीय अग्नी शमन प्रणाली बसवणे हे आगीच्या घटना टाळण्यासाठी महत्त्वाचे आहे. विशेषत: उष्णतेच्या उन्हाळ्यातील महिन्यांमध्ये व दिवाळीसारख्या उत्सवाच्या काळात ते अधिक गरजेचे आहे, कारण तेव्हा अधिक जास्त उष्णता निर्माण होण्याची जोखीम वाढलेली असते.

विजेमुळे आग लागण्याच्या घटनांचे वाढणारे प्रमाण भविष्यातील दुर्घटना टाळण्यासाठी निर्णायक व तत्काळ कृती करण्याची गरज आहे, असा इशारा आपल्याला देत आहे. (Mumbai)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.