नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 70 टक्के पाणीसाठा

208
नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात 70 टक्के पाणीसाठा

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातून यावर्षी पहिल्यांदाच पाण्याच्या विसर्ग करण्यात आला आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील चार धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात तसेच त्रंबकेश्वर परिसरामध्ये सातत्याने पाऊस सुरू आहे त्यामुळे नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठा हा 70 टक्के पर्यंत पोहोचला आहे. धरण परिसरामध्ये देखील पाऊस सुरू आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठा हा वाढला आहे म्हणूनच आता जिल्हा प्रशासनाने गंगापूर धरणातून 559 दशलक्ष घनफूट पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे सर्वसाधारण दुपारी दोन वाजेच्या आसपास हा पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे.

(हेही वाचा – Opposition Alliance Meeting : ‘या’ दिवशी मुंबईमध्ये होणार विरोधी आघाडीची तिसरी बैठक)

त्यामुळे नदीकाठी असलेल्या व्यवसायिक आणि रहिवाशांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतची माहिती नाशिक महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आल्यानंतर नाशिक महानगरपालिका प्रशासनाने देखील पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे महानगरपालिकेचे सर्व विभागीय अधिकारी यांना आपल्या भागामध्ये नागरिकांना सूचना देण्याचे आदेश मनपा आयुक्त करंजकर यांनी दिले असून तेदेखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

नाशिक जिल्ह्यातील चार धरणातून पाण्याचा विसर्ग होत आहे. यामध्ये दारणा धरणातून 2963 क्युसेस भावली धरणातून 290 क्युसेस, नांदूर मधमेश्वर धरणातून 5576 क्युसेस पाणीसाठा हा नदीपात्रात सोडण्यात आला आहे . आता यानंतर शुक्रवारी (२८ जुलै) दुपारी गंगापूर धरणातून पाणीसाठा सोडण्यात आला. तर उर्वरित धरणांमध्ये अजूनही काही प्रमाणात पावसाची आवश्यकता असल्यामुळे या ठिकाणाहून पाणीसाठा सोडण्यात आलेला नाही.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.