गणेशोत्सवाची लगबग सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. पुणे शहराला गणेशोत्सवाची पूर्वापार परंपरा लाभली आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही हा पारंपरिक उत्सव मोठ्या उत्साहाने पार पडणार असल्यामुळे पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. शहरात गणेशोत्सवानिमित्त ७ हजार पोलीस हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
१९ सप्टेंबरला गणरायाचे आगमन होणार आहे. त्यानिमित्त मानाच्या गणपती मंडळांसह शेकडो मंडळांची तयारी जवळपास शेवटच्या टप्प्यात आली आहे. पुण्यातील गणेशोत्सवाचा आनंद घेण्याकरिता इतर शहर तसेच परदेशातून भाविक येतात. त्यामुळे या दिवसांत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोथरूड येथून दोन दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले होते, या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस दल सज्ज झाले आहे.
(हेही वाचा – The India Club : ब्रिटनमधील भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या स्मृती जपणारे ‘इंडिया क्लब’ हे उपहारगृह होणार बंद )
पोलीस प्रशासनाकडून मंडळांना सूचना
पोलीस प्रशासनाकडून शहरात १ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाणार आहे. यामध्ये बॉम्ब स्क्वॉडदेखील तैनात केले जाणर आहे, अशी माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त आर. राजा यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community