70th National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचे नाव वगळण्यात आले

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी स्थापन केलेल्या समितीने विविध श्रेणींमध्ये दिल्या जाणाऱ्या सन्मानांसाठी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ च्या नियमांमध्ये बदल केले आहेत.

649
70th National Film Awards : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार श्रेणीतून इंदिरा गांधी आणि नर्गिस दत्त यांचे नाव वगळण्यात आले

७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ (70th National Film Awards) च्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहे. त्यानुसार माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि दिवंगत अभिनेत्री नर्गिस दत्त (Indira Gandhi Nargis Dutt) यांची नावे आगामी पुरस्कार सोहळ्यात वापरली जाणार नाहीत.

(हेही वाचा – CM Yogi Adityanath यांनी केली ज्ञानवापीच्या तळघरात पूजा)

७० वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ – 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी (70th National Film Awards) स्थापन केलेल्या समितीने विविध श्रेणींमध्ये दिल्या जाणाऱ्या सन्मानांसाठी ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार २०२२ च्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या बदलांमध्ये पुरस्काराच्या रक्कमेत वाढ करण्यासह काही श्रेणींमध्ये बदल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे बदल करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.

(हेही वाचा – Chandrasekhar Agashe : स्वातंत्र्य चळवळीत मोलाचे योगदान देणारे उद्योजक-चंद्रशेखर आगाशे )

नियमांमध्ये बदल – 

समितीने अपलोड केलेल्या अधिसूचनेत सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपटासाठीच्या इंदिरा गांधी पुरस्काराचा (70th National Film Awards) केवळ ‘दिग्दर्शकाचा सर्वोत्कृष्ट पदार्पण चित्रपट’ म्हणून उल्लेख करण्यात आला आहे, तर राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीच्या नर्गिस दत्त पुरस्काराचे नाव बदलून आता ‘राष्ट्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट’ असे नाव करण्यात आले आहे. पहिल्या चित्रपटासाठी दिग्दर्शकाला ३ लाख रुपये तर निर्माता आणि दिग्दर्शकाला रजत कमल आणि प्रत्येकी २ लाख रुपये दिले जाणार आहेत.

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी केली ‘सूर्य घर मोफत वीज योजने’ ची घोषणा)

प्रत्येक श्रेणीत केवळ एकच पुरस्कार –

प्रत्येक श्रेणीत केवळ एकच पुरस्कार देण्याची शिफारसही समितीने केली होती. पुरस्कारांची प्रतिष्ठा टिकवून ठेवण्यासाठी अपवादात्मक परिस्थितीतच सामायिक पुरस्कार दिले जाऊ शकतात. “… असे वाटले होते की स्वर्ण कमल विजेत्यासाठी एकसमान रोख पुरस्कार ₹ ३ लाख आणि रजत कमल विजेत्यासाठी २ लाख ठेवला जाऊ शकतो”, असे त्यात म्हटले आहे. (70th National Film Awards)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.