महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढता दिसत आहे. त्यामुळे सध्या चिंतेचे वातावरण पसरत आहे. राज्यात सोमवारी २४८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती, पण मंगळवारी याच नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होऊन ७११ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही दिवसातील १८६ टक्क्यांची वाढ आहे. दरम्यान मंगळवारी २४ तासांत ४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये साताऱ्यातील २ रुग्ण, पुण्यातील १ रुग्ण आणि रत्नागिरीतील १ रुग्णाचा समावेश आहे.
राज्यात गेल्या ७ दिवसांत ११ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण १.८२ टक्के आहे. एका आठवड्यात सक्रिय रुग्णांच्या संख्येत ६२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्यात आता ३ हजार ७९२ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
याच कोरोना वाढीच्या पार्श्वभूमीवर बोलत असताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, ‘सध्या कोरोना परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. घाबरण्याची गरज नाही. नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. काळजी करण्याची गरज नाही.’
(हेही वाचा – कोरोना चाचण्यांची संख्या वाढवा; आरोग्य सचिवांनी दिल्या खबरदारीच्या सूचना)
Join Our WhatsApp Community