72 hooren : स्टुडिओमध्ये ‘टीव्ही शो’च्या दरम्यान धर्मांध शोएब जमईची महिलेने केली धुलाई

'७२ हुरें' या चित्रपटावर आधारित हिंदी भाषेतील राष्ट्रीय वृत्तवाहिनी 'न्यूज १८' वर '७२ हुरें सच या फितूर' या विषयावर विशेष चर्चा आयोजित केली होती. त्यावेळी शोएब जमई आणि तसेच महिला सुबुई खान हे सहभागी होते.

185

देशात लवकरच ‘७२ हुरें’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दहशतवादी घडवताना मुसलमान तरुणांचे ब्रेनवॉश करताना त्यांना सांगितले जाते की, ‘जिहाद केल्यावर जन्नतमध्ये ‘७२ हुरें’ मिळतील अर्थात ७२ सुंदरी मिळतील. त्यावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटावर आधारित हिंदी भाषेतील राष्ट्रीय वृत्तवाहिनी ‘न्यूज १८’ वर ‘७२ हुरें सच या फितूर’ या विषयावर विशेष चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी शोएब जमई आणि सुबुई खान ही महिला यात सहभागी झाले होते. त्यामध्ये जमई यांनी सुबुई खान यांना अश्लील शिवीगाळ केली.

या चर्चासत्राच्यावेळी शोएब जमई यांना खान यांचा राग आला आणि त्यांनी त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. त्यांना अतिशय अश्लील शिवीगाळ देणे सुरु केले. ज्यामुळे त्या दोघांमध्ये प्रचंड वाद झाला. त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तरीही जमई शांत बसले नाहीत, त्यांनी अश्लील बोलणे सुरूच ठेवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यावर आता राजकीय पातळीवर आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत.

(हेही वाचा Monsoon good news : आला रे आला, ‘तो’ महाराष्ट्रात आला)

जमई हे विचारवंत नाहीत. ते त्यांच्या बोलण्यात कायम पाकिस्तान आणि बांगलादेश यांचे समर्थन करत असतात. कायम विघटनवादी आणि दहशतवाद्यांचे समर्थन करत असतात. देशात दंगली भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असताे. या चर्चेच्या दरम्यान जमई यांच्यासोबत प्रतिवाद करण्यासाठी महिला विचारवंत सुबुई खान उपस्थित होत्या. त्यांना जमई यांनी त्यांना अश्लील शिवीगाळ सुरु केली. ज्यामुळे त्यांच्याविरोधात बदनामी केल्याबद्दल भादंवि ४९९, १२६, ५२६, ५२४ अंतर्गत तातडीने गुन्हा दाखल केला पाहिजे, अशी मागणी होऊ लागली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.