श्रीगणेशोत्सवाकरीता कोकणात जाण्यासाठी ७४ विशेष ट्रेन्स

228

आगामी श्रीगणेशोत्सवाकरता ७४ श्री गणेशोत्सव विशेष गाड्या मध्य रेल्वेच्या चालवण्यात येणार आहे. यामध्ये मुंबई- सावंतवाडी दैनिक विशेषच्या ४४ सेवा, नागपूर ते मडगावच्या १२ सेवा, पुणे-कुडाळच्या ६ सेवा, पनवेल-कुडाळच्या ६ सेवा २१ ऑगस्टपासून ते ११ सप्टेंबर २०२२पर्यंत चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे या सर्व गणेशोत्सव विशेषसाठी बुकिंगसाठी येत्या ४ जुलै २०२२पासून संगणकीकृत आरक्षण केंद्रावर सुरु होणार आहे. यासाठी www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह हे आरक्षण करता येईल तसेच या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देवून माहिती जाणून घेता येवू शकते.

( हेही वाचा : बाळासाहेबांच्या स्मारकावर आजवर झाला ५० कोटींचा खर्च)

मुंबई – सावंतवाडी दैनिक विशेष (४४ सेवा)

  • 01137 विशेष छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून २१.ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत दररोज ००.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
  • 01138 विशेष गाडी सावंतवाडी रोड येथून २१.ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ पर्यंत दररोज १४.४० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०३.४५ वाजता पोहोचेल.
  • कुठल्या स्थानकावर थांबणार : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.
  • गाडीची स्थिती : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी.

नागपूर – मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष (१२ सेवा)

  • 01139 विशेष नागपूर येथून २४ऑगस्ट २०२२ ते १०सप्टेंबर२०२२ या कालावधीत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी रोजी १५.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.
  • 01140 विशेष मडगाव येथून २५ऑगस्ट.२०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ या कालावधीत प्रत्येक गुरुवार आणि रविवारी १९.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल.
  • कुठल्या स्थानकावर थांबणार : वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी.
  • गाडीची स्थिती : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

पुणे – कुडाळ विशेष (६ सेवा)

  • 01141 विशेष पुणे येथून २३ ऑगस्ट २०२२, ३०ऑगस्ट.२०२२ आणि ६.सप्टेंबर २०२२ रोजी ००.३० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
  • 01142 विशेष कुडाळ येथून दि. २३ ऑगस्ट २०२२, ३०ऑगस्ट.२०२२ आणि ६ सप्टेंबर२०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०६.५० वाजता पोहोचेल.
  • कुठल्या स्थानकावर थांबेल : लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
  • गाडीची स्थिती : १५ तृतीय वातानुकूलित, ३ शयनयान

पुणे – थिवि/कुडाळ – पुणे विशेष (६ सेवा)

  • 01145 विशेष पुणे येथून २६ऑगस्ट २०२२, २सप्टेंबर २०२२ आणि ९सप्टेंबर २०२२ रोजी १७.३० वाजता सुटेल आणि थिवि येथे दुसऱ्या दिवशी ११.४० वाजता पोहोचेल.
  • 01146 विशेष कुडाळ येथून २८ऑगस्ट २०२१, ४सप्टेंबर.२०२२ आणि ११ सप्टेंबर२०२२ रोजी १५.३० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी ०५.५० वाजता पोहोचेल.
  • कुठल्या स्थानकावर : चिंचवड, तळेगाव, लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड (फक्त 01145 साठी), थिवि (फक्त 01145 साठी).
  • गाडीची स्थिती :एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

पनवेल – कुडाळ/थिवि – पनवेल विशेष (६ सेवा)

  • 01143 विशेष ट्रेन पनवेल येथून २८ऑगस्ट २०२२, ४ सप्टेंबर.२०२२ आणि ११ सप्टेंबर२०२२ रोजी ०५.०० वाजता सुटेल आणि कुडाळ येथे त्याच दिवशी १४.०० वाजता पोहोचेल.
  • 01144 विशेष ट्रेन थिविम येथून २७ ऑगस्ट२०२२, ३सप्टेंबर२०२२ आणि १०सप्टेंबर२०२२ रोजी १४.४० वाजता सुटेल आणि पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.
  • कुठल्या स्थानकावर थांबणार : रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अडावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ (फक्त 01144 साठी), सावंतवाडी रोड (फक्त 01144 साठी)
  • गाडीची स्थिती : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, २ गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.

कुठे कसे करणार आरक्षण :

सर्व गणेशोत्सव विशेषसाठी बुकिंग ४जुलै.२०२२रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कासह सुरू होईल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट देऊन माहित जाणून घेऊ शकता.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.