बॅंकांची कामे म्हटली की, डोक्याला कटकट आलीच. बॅंकेतील कामे करण्यासाठी एका ठराविक वेळेतच जावे लागते. त्याच वेळेत कामे उरकली जातात. पण आता मात्र तसे होणार नाही. कारण, देशातील बॅंका आता आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे 24 तास सुरु राहणार आहेत. त्याअनुषंगाने आता आरबीयाने पावले टाकायलाही सुरुवात केली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात बॅंकांच्या तास आणि सातही दिवसांच्या कामाचा मुद्दा नमूद करण्यात आला होता. आता आरबीआयकडून बॅंका सुरु ठेवण्यासाठी पुढील पावले उचलली जात आहे.
75 जिल्ह्यांत 75 डिजीटल बॅंक
जनधन बॅंक खात्यानंतर आता देशातील 75 जिल्ह्यांत 75 डिजिटल बॅंक युनिट्स उघडण्यात येणार असून, यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आरबीआयच्या या मार्गदर्शक सूचना सर्व व्यावसायिक बॅंकाना लागू होणार आहेत. या अंतर्गत ग्रामीण बॅंक, पेमेंट्स बॅंक आणि स्थानिक बॅंकांचा समावेश करण्यात आलेला नाही.
ऑनलाईन फसवणूक होणार नाही
रिझर्व्ह बॅंकेने डिजिटल बॅंकेत पुरेशी सुरक्षाव्यवस्था ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय ग्राहकांची ऑनलाईन फसवणूक होऊ नये, म्हणून पुरेशी सायबर सुरक्षाही ठेवण्यात येणार आहे. या सुरक्षेची सर्व जबाबदारी संबंधित बॅंकेची असणार आहे.
या गोष्टींचा असणार समावेश
या डिजीटल बॅंकींग युनिटमध्ये नेमके काय असणार आहे. याच्या गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. या खालील गोष्टी डीबीयूमध्ये असणार आहेत.
( हेही वाचा: कंपनीच्या गेटवरच तब्बल 20 ईलेक्ट्रिक गाड्यांनी घेतला पेट! )
- इंटरएक्टीव टेलर मशिन
- इंटरएक्टीव बॅंकर
- सर्विस टर्मिनल
- टेलर
- कॅश रिसायकलर्स इंटरएक्टीव वाॅच
- डाॅक्युमेंट अपलोडिंग
- सेल्फ सर्विस कार्ड
- व्हिडीओ केव्हायसी