अवघ्या 75 दिवसांत 75 समुद्र किनारे होणार स्वच्छ

3 जुलै ते 17 सप्टेंबर 2022 या 75 दिवसांत देशातील 75 समुद्र किनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबविली जाईल. या वर्षीचा कार्यक्रम विशेष असणार आहे, हा आतापर्यंतचा सर्वाधिक कालावधीचा असेल आणि यात लोकांचा आजवरचा सर्वाधिक सहभाग असेल. देशाच्या किनारी भागांच्याच नाही तर इतर भागांच्या समृद्धीसाठी ‘स्वच्छ सागर, सुरक्षित सागर’ हा संदेश पोहोचविण्यासाठी यात सामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

समुद्र किनाऱ्यांवरून 1,500 टन कचरा काढणे लक्ष्य

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, १६ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय समुद्र किनारे स्वच्छता दिन 2022’ तयारीची आढावा बैठक झाली. हा दिवस 17 सप्टेंबर 2022 रोजी पृथ्वी भवन, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या मुख्यालयात साजरा करण्यात येईल. सध्या आपण स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देखील साजरा करतो आहोत. हा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी साजरा केला जातो, असे डॉ. सिंग यांनी सांगितले. यावर्षी हा कार्यक्रम 17 सप्टेंबरला साजरा होणार आहे. योगायोगाने त्यादिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस देखील असतो. पंतप्रधान मोदी हे स्वच्छतेबद्दल आग्रही असतात आणि त्यांनी देशात स्वच्छतेची, समुद्र किनारे, पर्यावरण आणि हवामान यांचे सर्व प्रकारे संरक्षण याची सुरुवात केली आहे. समुद्र किनाऱ्यांवरून 1,500 टन कचरा काढणे हे या मोहिमेचे लक्ष्य आहे, ज्यामुळे सागरी जिवांना मोकळा श्वास घेता येईल आणि किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना देखील याचा लाभ होईल, असेही केंद्रीय राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह म्हणाले.

(हेही वाचा चुकीच्या पद्धतीने वाहने उभी केल्याचा फोटो पाठवा ५०० रुपये कमवा!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here