फेब्रुवारी-मार्च २०२३ दरम्यान होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. याबाबत सर्व शाळा आणि ज्युनिअर महाविद्यालयांना आदेश जारी करण्यात आले आहे.
७५ टक्के उपस्थिती अनिवार्य
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आता ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. पुढील वर्षीपासून हा निर्णय लागू होईल. किमान ७५ टक्के उपस्थिती असल्याशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही. दहावी आणि बारावीतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेऊन किमान ७५ टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचीच प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागणार आहे.
दरम्यान, याआधी सीबीएसईकडून विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घेण्यात आला होता. सीबीएसईने मुलांना ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य केली होती. या संदर्भातील परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. सीबीएसईने देशभरातील शाळांना १८ जुलै २०२२ ला परिपत्रक पाठवून विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के उपस्थिती असावी या संदर्भातील सूचना दिल्या होत्या. सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. आता सीबीएसईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बोर्डाने सुद्धा ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community