
-
विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई महानगरपालिकेच्या एस विभाग हद्दीतील भांडूप पश्चिम परिसरातील कक्कय्या शेट्टी मार्गावरील ७५ अनधिकृत बांधकामे (Unauthorized Constructions) बुधवारी, १२ मार्च २०२५ रोजी निष्कासित करण्यात आली आहेत. यामध्ये ६२ घरे आणि १३ दुकानांचा समावेश आहे. या कारवाईमुळे हिंद रेक्टिफायर कंपनी ते कक्कय्या शेट्टी हा ३ मीटर अरुंद असलेला मार्ग आता १८.३० मीटर इतका रुंद झाला आहे.
मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. उप आयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एस विभागाचे सहायक आयुक्त भास्कर कसगीकर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी दोन बुलडोझर, २ जेसीबी, दोन इतर वाहने, ८० कामगार, ३० अभियंते, १५ पोलीस इतका फौजफाटा तैनात होता. (Unauthorized Constructions)
(हेही वाचा – हरियाणात BJP च्या विजयाची घौडदौड; राज्यात १० पैकी ९ महापालिकेत भाजपाचा महापौर)
हिंद रेक्टिफायर कंपनी ते कक्कय्या शेट्टी मार्ग या रस्त्यावर अतिक्रमणांमुळे (Unauthorized Constructions) हा मार्ग ३ मीटर इतका अरुंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरून लाल बहाद्दूर शास्री मार्गाकडे जाताना एकावेळी एकच वाहन जात होते. तसेच अनेक नागरिकांना गावदेवी, तुळशेतपाडा या ठिकाणी जाताना दोन किलोमीटरचा फेरा पार करून जावे लागत होते. ही बाब लक्षात घेता महानगरपालिकेने कारवाई हाती घेतली.
हिंद रेक्टिफायर कंपनी ते कक्कय्या शेट्टी हा ३ मीटर अरुंद असलेला मार्ग कारवाईनंतर १८.३० मीटर इतका रुंद झाला आहे. तसेच दोन किलोमीटर फेरा पार करण्याऐवजी नागरिकांना आता केवळ ५० मीटर अंतर पार करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. कारवाईदरम्यान निष्कासित करण्यात आलेली ७५ बांधकामे तळमजला आणि त्यावर एक मजला अशा स्वरुपाची होती. त्यात ६२ घरे व १३ दुकाने होती. या ठिकाणी पात्र राहणाऱ्या नागरिकांचे यापूर्वीच पुनर्वसन करण्यात आले आहे. (Unauthorized Constructions)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community