भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्ष साजरे केले जात आहे. गुगलनेही हा दिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त गुगलने अनोखे Doodle बनवले आहे. भारताची संस्कृती दाखवणारे हे डूडल आहे.
गुगलने एक GIF तयार केले
केरळची कलाकार नीतीने हे डूडल तयार केले आहे. ज्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरे करताना दाखवण्यात आले आहे. या खास प्रसंगी गुगलने एक GIF तयार केले आहे. या डूडलमध्ये भारताच्या संस्कृतीचे चित्रण तयार करण्यात आले आहे. हे Google डूडल 75 वर्षांतील भारताच्या महान उंचीचे प्रतीक आहे.
( हेही वाचा: समर्थ भारताची आक्रमक परराष्ट्रनीती! )
गुगलने एक आर्ट कल्चरचे पेज बनवले आहे. या पेज वर गुगलकडून एक व्हिडिओ बनवण्यात आला आहे. या वेबसाईटवर महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्यासह सर्व नेत्यांची प्रतिमा दाखवण्यात आली आहे. गुगलने 2 मिनिटांचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
Join Our WhatsApp Community