NEET UGच्या पुनर्परीक्षेत १५६३ पैकी ७५० विद्यार्थी गैरहजर, CBIने पहिला FIR नोंदवला

७२०/७२० गुण मिळवणारे ६ उमेदवार झज्जर केंद्र, हरियाणातून हजर झाले होते.

155
NEET UGच्या पुनर्परीक्षेत १५६३ पैकी ७५० विद्यार्थी गैरहजर, CBIने पहिला FIR नोंदवला

सीबीआयने NEET-UG परीक्षेतील गैरप्रकाराबाबत शिक्षण मंत्रालयाच्या तक्रारीवरून पहिला एफआयआर रविवारी, २३ जून रोजी नोंदवला. मंत्रालयाकडून मिळालेल्या काही संदर्भांच्या आधारे, अज्ञात लोकांविरुद्ध आयपीसीच्या कलम १२०-बी (गुन्हेगारी कट) आणि ४२० (फसवणूक) यासह विविध कलमांखाली एफआयआर नोंदवण्यात आला.

सीबीआयने (CBI) तपासासाठी २ विशेष पथके तयार केली आहेत, जी पाटणा आणि गोध्रा येथे जाणार आहेत. केंद्र सरकारने २२ जूनच्या रात्री तपासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली होती. यापूर्वी, सरकारने शनिवारी रात्री ९ वाजता एनटीए (नॅशनल टेस्टिंग एजन्सी) चे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांना हटवले होते. त्यांच्या जागी नवे डीजी म्हणून प्रदीप सिंह खरोला यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Mumbai-Pune Train: डेक्कन आणि इंटरसिटी एक्सप्रेस ३ दिवस बंद; कारण जाणून घ्या )

त्याच वेळी, ५ मे रोजी झालेल्या NEET परीक्षेच्या निकालात ग्रेस गुण मिळालेल्या १५६३ उमेदवारांसाठी रविवारी पुनर्परीक्षा घेण्यात आली. परीक्षा दुपारी २ ते ५.२० या वेळेत होणार होती. १५६३ पैकी केवळ ८१३ उमेदवार परीक्षेला बसले होते. ७५० उमेदवार परीक्षेला बसले नाहीत. चंदीगडमध्ये फक्त दोन उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र बनवण्यात आले होते, ते दोघेही आले नाहीत.

इंडियन मेडिकल असोसिएशनने (IMA) पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, आरोग्य मंत्री जेपी नड्डा आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे NEET UG परीक्षेतील वादांवर कारवाई केल्याबद्दल आभार मानले आहेत.

याशिवाय NEET UG परीक्षेतील गैरव्यवहाराचा तपास CBI कडे सोपवल्याबद्दल आणि NTA च्या महासंचालकांना हटवल्याबद्दल IMA ने शिक्षण मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

६ शहरांमध्ये परीक्षा
NEET ची पुनर्परीक्षा त्या सहा शहरांमध्ये घेतली, जिथे वेळेचे नुकसान झाल्यामुळे मुलांना ग्रेस मार्क्स देण्यात आले होते. फेरपरीक्षा या ६ शहरांमध्ये आहे मात्र परीक्षा केंद्रे बदलण्यात आली. ही ६ शहरे आहेत-
बालोद, छत्तीसगड
दंतेवाडा, छत्तीसगड
सुरत, गुजरात
मेघालय, मेघालय
बहादूरगड, हरियाणा
चंदीगड

हरियाणाच्या झज्जर केंद्रात परीक्षा होणार नाही
७२०/७२० गुण मिळवणारे ६ उमेदवार झज्जर केंद्र, हरियाणातून हजर झाले होते. या केंद्रावर पुनर्परीक्षा घेतली जाणार नाही. शिक्षण मंत्रालयाशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, परीक्षेदरम्यान कोणतीही अडचण येऊ नये यासाठी परीक्षा केंद्रांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

परीक्षा केंद्रांवर शिक्षण मंत्रालयाचे अधिकारी उपस्थित
एनटीएने या परीक्षेसाठी स्थापन केलेल्या परीक्षा केंद्रांवर निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर एनटीए आणि शिक्षण मंत्रालयाचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.

एनटीए सुधारण्यासाठी ७ सदस्यांची समिती स्थापन 
यापूर्वी, २२ जून रोजी दुपारी, शिक्षण मंत्रालयाने एनटीए परीक्षांमध्ये अनियमितता रोखण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी ७ सदस्यीय उच्चस्तरीय समितीची घोषणा केली होती. इस्रोचे माजी अध्यक्ष आणि आयआयटी कानपूरचे माजी संचालक के. राधाकृष्णन हे त्याचे प्रमुख असतील. ही समिती २ महिन्यांत आपला अहवाल शिक्षण मंत्रालयाला सादर करेल.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.