महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून एसटीला ओळखले जाते. राज्याच्या कानाकोप-यात असलेल्या प्रत्येक गावात जाण्यासाठी लालपरी ही प्रत्येकाला हक्काची वाटते. याच लालपरीला येत्या 1 जून रोजी 74 वर्ष पूर्ण होणार असून ती अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार आहे. या निमित्ताने 1 जून 2022 रोजी एसटीचा वर्धापन दिन संपूर्ण महाराष्ट्रात साजरा करण्यात येणार आहे.
सर्व आगांरात वर्धापन दिन साजरा होणार
1 जून 1948 रोजी पुणे ते अहमदनगर या मार्गावर एसटी महामंडळाची सर्वात पहिली बस धावली होती. तेव्हापासून एसटीच्या लालपरीचा हा यशस्वी प्रवास अविरत चालू आहे. त्यामुळे दरवर्षी 1 जून रोजी एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याचप्रमाणे या वर्षी एसटीचे 75व्या वर्षात पदार्पण होणार असल्याने राज्यातील सर्व आगारांमध्ये एसटीचा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे.
(हेही वाचाः युद्धातही देशाच्या मदतीला धावून आली होती ‘एसटी’)
परिवहन मंडळाच्या सूचना
या वर्धापन दिनी सर्व आगार तसेच बस स्थानकांवर सजावट करण्यात येणार आहे. तसेच आगारातील प्रत्येक बस ही स्वच्छ धूऊन मार्गस्थ करण्यात येणार आहे. सर्व बस स्थानकांवर सकाळी 10 वाजता सर्व प्रवासी आणि कर्मचा-यांना पेढे वाटून वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देण्याच्या सूचना राज्य परिवहन मंडळ तसेच परिवहन मंत्र्यांकडून देण्यात आल्या आहेत.
Join Our WhatsApp Community