देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. देशभरात स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारवाड्यासमोर मध्यरात्री बारा वाजता ध्वजारोहण करण्यात आले. अमृत महोत्सवानिमित्त शनिवारवाडा परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. ध्वजारोहणा दरम्यान जवळपास 3 हजार नागरिक उपस्थित होते. भारत माता की जयच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पुणेकर मोठ्या उत्साहाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
( हेही वाचा: स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात रक्तदान शिबिराला सुरुवात )
देशभरात स्वातंत्र्य दिनाचा उत्साह
संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे.. तसेच, 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशातील महत्त्वाच्या ऐतिहासिक इमारतींना सजवण्यात आले असून, आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community