दहीहंडी २०२२ : दिवसभरात ७८ गोविंदा जखमी

103

शुक्रवारी दिवसभरात ७८ गोविंदा जखमी झाल्याची नोंद झाली. सायंकाळी सहावाजेपर्यंत ६७ गोविंदाना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज दिला गेला. अकरा गोविंदावर उपचार सुरु होते. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे प्रशासनाच्यावतीने कळवण्यात आले.

( हेही वाचा : उपायुक्त हसनाळे यांना लागली लॉटरी)

गंभीर रुग्ण आढळले नाहीत

सर्वात जास्त गोविंदा केईएम रुग्णालयात दाखल होते. केईएम रुग्णालयात १७ रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यापैकी एका रुग्णाला अत्यावश्यक सर्जरी विभागात दाखल करावे लागले. पण रुग्णाच्या तब्येतीविषयी केईएम रुग्णालयाने माहिती दिली नाही. जीटी रुग्णालयांत ११ रुग्णांना उपचार दिले गेले. दोन्ही रुग्णालयांत कोणत्याही रुग्णाला गंभीर जखमा दिसून आल्या नाहीत. राजावाडी रुग्णालयात १० रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले होते. नायर रुग्णालयात ९, सायन रुग्णालयात ७, कूपर आणि व्ही एन देसाई रुग्णालयात प्रत्येकी ६ रुग्णांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले. पोदार रुग्णालायतही ४ रुग्ण उपचारांसाठी दाखल झाले. सेंट जॉर्ज रुग्णालयात ३, जेजे आणि जोगेश्वरीतील बाळासाहेब ट्रॉमा केअर रुग्णालयात प्रत्येकी २, कांदिवलीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातही एका रुग्णावर उपचार सुरु होते. मुंबईभरात कोणत्याही रुग्णालयात गंभीर रुग्ण आढळला नसल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.