कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी झाला असून, मुंबई आता पुन्हा वेगाने धावू लागली आहे. त्यामुळे आता वर्क फ्राॅम होम बंद झाले असून, मुंबईकर आता नियमित ऑफिसला जाऊ लागले आहेत. मात्र, आजही अनेक मुंबईकरांना घरुनच काम करावेसे वाटते आहे. जवळजवळ 78 टक्के मुंबईकरांना वर्क फ्राॅम होमच असावे, असे वाटत असल्याचे होम लिव्हेबिलिटी फॅक्टर्सच्या अभ्यासातून समोर आले आहे.
होम लिव्हेबिलिटी फॅक्टर्सच्या अभ्यासानुसार, ( home liveabiliity factor) मुंबईकर निसर्गाबाबत अधिक जागरुक झाले आहेत. अन्नाची नासाडी टाळण्यावर भर देत आहेत. घर खरेदी करणारे आता मुलभूत चेकलिस्टच्या पलीकडे जात आहेत. विशिष्ट डिझाइन केलेल्या आणि स्मार्ट घरांच्या शोधात आहेत. ही घरे केवळ तांत्रिकदृष्ट्या विकसित नाहीत, तर सुरक्षितता आणि आधुनिक सुविधा देतील, अशी असावीत असे त्यांचे म्हणणे आहे. 84 टक्के मुंबईकरांना त्यांच्या घरात आणि आजूबाजूच्या परिसरात निसर्गाशी जोडणे महत्त्वाचे वाटते आहे.
( हेही वाचा: भाजपा हिंदूंचे सण सुरु ठेवणारा पक्ष! आशिष शेलार यांचा उद्धव ठाकरेंना टोला )
80 टक्के मुंबईकरांना छंद आणि आवड जोपासणे महत्त्वाचे वाटते आहे. त्यासाठी त्यांनी त्यांच्या घरात जागाही विकसित केली आहे. महामारीच्या काळात मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य ही आणखी एक महत्त्वाची चिंता होती. 58 टक्के मुंबईतील घर खरेदीदारांनी मान्य केले की ते निरोगी आणि सुरक्षित राहण्यासाठी वातावरण सुनिश्चित करण्याचा प्रयत्न करतात, तर 24 टक्के लोकांना वाटते की त्यांचे घरगुती जीवन त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर केंद्रित आहे.
Join Our WhatsApp Community