जीवंतपणी आणि मृत्यूपश्चात जीवदान देणारा अवयवदाता

163

गुजरात येथील जामनगर येथे राहणा-या अमृतलाल शाह (७८) या वृद्धाने आपल्या मरणानंतर अवयवदान करत नवा आदर्श समाजासमोर मांडला. वयाच्या ७८व्या वर्षी अमृतलाल यांनी यकृत तसेच त्वचेचे दान केले. त्याअगोदर २५ व्या वर्षीही अमृतलाल शाह यांनी आपल्या शरीरातील एक मूत्रपिंड मित्राला देत त्याला नवे आयुष्य दिले होते. आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजकार्यासाठी योगदान देणा-या अमृतलाल शाह यांची शेवटची आठवणही समाजकार्याशीच निगडीत असल्याचे समाधान कायम राहील, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले.

( हेही वाचा : १५ डिसेंबरपासून समृद्धी महामार्गावर धावणार ‘लालपरी’! ‘या’ नागरिकांना मिळणार ५० टक्के सवलत; जाणून तिकीट दर…)

नेमकी घटना काय

६ डिसेंबर रोजी अमृतलाल शाह आपल्या कौटुंबिक कार्यक्रमात गेले होते. त्यावेळी अचानक त्यांना डोकेदुखीचा त्रास व्हायला लागला. तेव्हा कुटुंबीयांनी अमृतलाल शाह यांना रुग्णालयात दाखल केले. तपासणीदरम्यान, अमृतलाल यांना पक्षाघाताचा त्रास होत त्यांच्या मेंदूत रक्तस्त्राव होत झाल्याचे डॉक्टरांनी कुटुंबीयांना सांगितले. रुग्णालय बदलूनही अमृतलाल यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झाली नाही. प्रकृती खालावल्याने अमृतलाल मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मृत अवस्थेत शरीरातील अवयव हळूहळू निकामी होतात त्यामुळे या काळात रुग्णाच्या शरीरातून अवयवदान करता येते. अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना नवा अवयव मिळाल्यास त्यांचे जीवनमान उंचावते, अशी माहिती डॉक्टरांनी अमृतलाल यांच्या कुटुंबीयांना दिली. अमृतलाल यांनी ५३ वर्षांपूर्वी वयाच्या २५ व्या वर्षी आपल्या मित्राला आपले एक मूत्रपिंड दिले होते. अमृतलाल यांनी आपले संपूर्ण आयुष्य एकाच मूत्रपिंडावर काढले. त्यांच्या मृत्यूनंतरही कुटुंबीयांनी यकृत आणि त्वचा दान केली. अमृतलाल यांचे मूत्रपिंड वैद्यकीय कारणास्तव दान करता आले नाही. अवयवदानामुळे काकांचे समाजकार्य त्यांच्या मरणानंतरही कायम राहिले, अशी प्रतिक्रिया अमृतलाल यांचा पुतण्या अश्मीत शाह यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.