7th Pay Commission : सरकारचा झटका; केंद्रीय कर्मचाऱ्यांना बसणार आर्थिक फटका

140

नेहमी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अमुक इतकी वाढ, अमुक इतकी थकबाकी मिळणार, अमुक इतका बोनस मिळणार, पण ही बातमी काही वेगळी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना आर्थिक फटका देणारी आहे. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता अर्थात डीएची 18 महिन्यांची थकबाकी देणार नाही. असा आदेश केंद्रीय अर्थ मंत्रालयाने काढला आहे.

काय म्हटले सरकारने? 

केंद्र सरकारने कोरोना स्थितीचा हवाला देत 18 महिने, म्हणजेच 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 दरम्यान कर्मचाऱ्यांना डीए दिलेला नाही. ही परिस्थिती सुधारल्यानंतर सरकार डीएची थकबाकी देईल, असे मानले जात होते, मात्र आता सरकारच्या स्पष्टीकरणानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सरकार 18 महिन्याचा थकीत महागाई भत्ता देण्यावर विचार करत आहे का? असा प्रश्न राज्यसभा खासदार नारण-भाई जे. राठवा यांनी, अर्थमंत्र्यांना केला होता. त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देताना अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले, केंद्रीय कर्मचाऱ्यांना/पेन्शनर्सना 18 माहिन्यांच्या महागाई भत्याची थकबाकी देण्यासंदर्भात विविध निवेदने प्राप्त झाली आहेत. आर्थिक वर्ष 2020-21 नंतरही परिस्थिती व्यवस्थित राहिलेली नाही. यामुळे थकित महागाई भता जारी करणे व्‍यवहार्य समजले गेले नाही.

(हेही वाचा चीनच्या वेबसाईट केल्या हॅक, ‘बोलो पावभाजी’ चर्चेत)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.