Increased DA : मोदी सरकारने DA वाढवला, पण कितीने जाणून घ्या..

दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड गिफ्ट दिलं आहे. दरम्यान, मोदी सरकानं केंद्रीय कर्मचारी आणि पेशन्सधारकांना फायदा होणार असून त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये जोरदार वाढ होणार आहे.

113
Increased DA : मोदी सरकारने DA वाढवला, पण कितीने जाणून घ्या..
Increased DA : मोदी सरकारने DA वाढवला, पण कितीने जाणून घ्या..

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची सर्वात मोठी घोषणा. नरेंद्र मोदी सरकारनं (Modi Government) दिवाळीपूर्वी  केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या (Central Employees) महागाई भत्त्यात (DA Hike)४ टक्के वाढ केली आहे. यानंतर त्यांना मिळणारा डीए (DA) आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के झाला आहे.दिवाळीपूर्वीच केंद्रीय कर्मचाऱ्यांना गोड गिफ्ट दिलं आहे. दरम्यान, मोदी सरकानं केंद्रीय कर्मचारी आणि पेशन्सधारकांना फायदा होणार असून त्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये जोरदार वाढ होणार आहे. (Increased DA)

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. सरकार वर्षातून दोनदा DA मध्ये सुधारणा करते. ज्याचा लाभ त्यांना १ जानेवारी व १ जुलैपासून दिला जातो. महागाई भत्त्यात बदलाचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर दिसून येतो. DA वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारही वाढतो. सरकार महागाई दराची आकडेवारी लक्षात घेऊन महागाई भत्त्याबाबत अंतिम निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित असते.

(हेही वाचा :Diwali Bonus : केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट)

कर्मचारी सतत ४ टक्के डीए वाढीची मागणी करत आहेत. कर्मचार्‍यांच्या पगाराचा डीए हा महत्त्वाचा भाग असून त्यात वाढ झाल्याचा थेट परिणाम कर्मचार्‍यांना मिळणाऱ्या पगारावर होतो. पण ते कसे ठरवले जाते हे तुम्हाला माहिती आहे का? महागाईचा दर लक्षात घेऊन सरकार कर्मचाऱ्यांचा डीए वाढवण्याचा निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित आहे. यासाठी CPI-IW डेटा मानक मानला जातो. जुलै २०२३ मध्ये, CPI-IW ३. ३ अंकांनी वाढून १३९.७ वर पोहोचला होता. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीशी तुलना केल्यास ती सुमारे ०. ९०टक्के अधिक होती. यापूर्वी जून २०२३मध्ये ते १३६. ४होते आणि मे महिन्यात ते १३४. ७ होते. जर आपण ऑगस्टबद्दल बोललो तर ०.५ टक्क्यांची घसरण नोंदवली गेली आहे, ती १३९.२टक्क्यांवर आली आहे. अशा परिस्थितीत सरकार ४ ऐवजी ३ टक्के वाढ देऊ शकते, म्हणजेच महागाई भत्ता ४२ वरून ४५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.