केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोदी सरकारने खुशखबर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत डीए अर्थात महागाई भत्त्यामध्ये ४ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेताल आहे. केंद्र सरकारने महागाई भत्ता ३८ टक्क्यांवरून ४२ टक्के केला आहे. यामुळे कोट्यावधी पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
( हेही वाचा : सभेपूर्वीच उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदेंचा दणका! ३ माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश )
महागाई भत्त्यामध्ये वाढ
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी अतिरिक्त हफ्ता देण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. दिनांक १ जानेवारी २०२३ पासून हा हफ्ता लागू असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. या अतिरिक्त भत्त्यात महागाईविषयक भरपाई म्हणून, मूळ वेतन निवृत्तीवेतनाच्या विद्यमान ३८% या दरात ४% टक्के इतकी वाढ केली आहे.
महागाई भत्ता आणि महागाईपोटीचे सहकार्य म्हणून दिल्या जाणाऱ्या या सवलतीसाठी केंद्र सरकारच्या तिजोरीतून एकत्रितपणे दरवर्षी 12,815.60 कोटी रुपये खर्च होणार आहेत. केंद्र सरकारचे सुमारे ४७.५८ लाख कर्मचारी आणि ६९.७६ लाख निवृत्तीवेतनधारकांना सरकारच्या या निर्णयाचा लाभ मिळेल.
Join Our WhatsApp Community