7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना २०२३ ठरणार लाभदायक; महागाई भत्ता किती वाढेल? जाणून घ्या संपूर्ण माहिती

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून लवकरत महागाई भत्त्यात २०२३ मध्ये वाढ होणार आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या सप्टेंबरच्या AICPI निर्देशांकाच्या आकडेवारीत झालेल्या वाढीवरून कामगार विभागाने हा अंदाज काढला आहे. दर सहा महिन्यांनी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होते आणि हा भत्ता किती वाढणार हे AICPI च्या निर्देशांकावर अवलंबून असते. जुलै-ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबरच्या आकडेवारीत १.१ अंकांची वाढ झाली. सप्टेंबरमध्ये AICPI आकडा १३०.२ वरून १३१.३ पर्यंत वाढला त्यामुळे जानेवारी २०२३ मध्ये महागाई भत्त्यात पुन्हा वाढ होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

( हेही वाचा : बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार तब्बल २ हजार नव्या गाड्या; प्रवास होईल सुकर )

याचा फायदा सरकारचे ५० लाख कर्मचारी आणि ६५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. जानेवारीमध्ये डीए वाढला तर ४२ टक्के होईल. यामुळे किमान मूळ वेतनात दरमहा एकूण ७२० रुपयांची वाढ होणार आहे. AICPI निर्देशांकाची संख्या जानेवारी २०२३ मध्ये महागाई भत्ता किती वाढेल हे ठरवेल. जानेवारी २०२३ मधील वाढ डिसेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार असेल. मार्च २०२३ मध्ये होळीच्या जवळपास या भत्त्याची अधिकृत घोषणा केली जाईल. सध्या ३८ टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे.

पगारात काय फरक पडणार?

जर तुमचे किमान वेतन १८००० असेल तर…

  • कर्मचार्‍याचे मूळ वेतन – १८ हजार रुपये
  • नवीन महागाई भत्ता – (४२%) ७ हजार ५६० महिना
  • आतापर्यंत महागाई भत्ता – (३८%) ६ हजार ८४० महिना
  • महागाई भत्ता कितीने वाढला = ७२० रुपये प्रतिमहिना
  • वार्षिक पगारात वाढ ७२० X १२ = ८ हजार ६४०

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here