केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2023 पासून हा वाढीव डीए मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
( हेही वाचा : IRCTC ई-कॅटरिंग : PNR टाका आणि व्हॉट्सअॅपवर ऑनलाइन जेवण मागवा! काय आहे रेल्वेची भन्नाट योजना)
महागाई भत्त्यामध्ये वाढ होण्याची शक्यता
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक यांच्या महागाई भत्त्यामध्ये केंद्र सरकार 4 टक्के वाढ करु शकते. सरकारच्या या निर्णयाचा लाभ तब्बल एक कोटी केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार आहे. सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 38 टक्के आहे. ज्यामध्ये 4 टक्के वाढ करुन हा महागाई भत्ता 42 टक्के होण्याची शक्यता आहे. महागाई भत्ता वाढवण्याचा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती आहे. डिसेंबर 2022 साठी 31 जानेवारी 2023 रोजी ग्राहक निर्देशांक जारी करण्यात आलेला आहे. या निर्देशांकानुसार महागाई भत्त्यात 4.24 टक्के वाढ बसते. वित्त मंत्रालयाकडून यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु आहे. त्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब झाल्यावर महागाई (डीए) वाढीची अधिकृत घोषणा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून हा महागाई भत्ता १ जानेवारी २०२३ पासून लागू करण्यात येणार आहे.
Join Our WhatsApp Community