7th Pay Commission : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट! १८ महिन्यांची DA थकबाकी लवकरच मिळणार?

236

दिवाळीमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता घोषित झाल्यावर आता १८ महिन्यांच्या प्रलंबित महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबतचा मुद्दा पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. जानेवारी २०२० ते जून २०२१ या कालावधीमधील प्रलंबित १८ महिन्यांच्या थकबाकीबाबत केंद्र सरकार लवकरच निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

( हेही वाचा : Snapchat वापरताय तर सावधान! प्रायव्हसीमध्ये बग; नाशिकच्या विद्यार्थ्याने लावला शोध)

१८ महिन्यांची थकबाकी 

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी महागाई भत्त्याच्या थकबाकीबाबत कॅबिनेट सचिवांसोबत बैठकीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. परंतु ही थकबाकी देण्यास सरकार सहमती देईल की नाही, यावर अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. परंतु कर्मचारी संघटनांच्या वाढत्या दबावानंतर कॅबिनेट सचिवांनी या विषयावर चर्चेसाठी वेळ दिला आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी २०२० ते जून २०२१ या कालावधीतील ३ हप्त्यांचा थकीत महागाई भत्ता मिळालेला नाही. कोरोनाच्या कालावधीमध्ये सरकारने थकबाकी जमा केली नव्हती यामुळे सरकारने जुलै २०२१ पासून भत्ता वाढवला आहे.

किती मिळणार थकबाकी?

लेव्हल १ कर्मचाऱ्यांची डीए थकबाकी ११ हजार ८८० ते ३७ हजार रुपये असेल. स्तर १३ कर्मचाऱ्यांना १ लाख ४४ हजार २०० ते २ लाख १८ हजार २०० रुपये महागाई भत्ता थकबाकी म्हणून दिला जाऊ शकतो. असे झाल्यास सरकारी कर्मचाऱ्यांना खूप फायदा होईल. यामुळेच कर्मचारी संघटनांकडून थकबाकीची मागणी करण्यात येत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.