सरकारी कर्मचा-यांना नवरात्रीत मोठी आनंदाची बातमी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा एकदा वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच महागाई भत्ता वाढ,थकबाकी आणि फिटमेंट फॅक्टर संदर्भात मोठी घोषणा होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा निर्णय झाल्यास केंद्रीय कर्मचा-यांच्या पगारात मोठी वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तनुसार केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जुलै महिन्याच्या अखेरीस याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते पण याबाबत कुठलाही निर्णय न झाल्यामुळे आता नवरात्रीत किंवा नवरात्रीच्या आधीच केंद्र सरकारकडून याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. असे झाल्यास केंद्र सरकारी कर्मचा-यांसाठी ही मोठी गुड न्यूज असणार आहे. याचा फायदा 50 लाख कर्मचारी तसेच 65 लाख पेंशनधारकांना होणार आहे.
(हेही वाचाः जागतिक वडापाव दिवसः जीभेचे चोचले पुरवणारा वडापाव एकेकाळी गिरणी कामगारांचे घर चालवत होता)
38 टक्के होणार भत्ता
महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ झाल्यास केंद्र सरकारचा महागाई भत्ता 34 टक्क्यांवरुन 38 टक्के होणार आहे. याच वर्षी मार्च महिन्यात केंद्र सरकारने महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ करत 31 वरुन 34 टक्के केला होता. महागाईचा दर लक्षात घेऊन सरकारकडून कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ केली जाते.
Join Our WhatsApp Community