नववर्षात पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळणार आहे. पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना अखेर सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे. महापालिकेच्या धर्तीवर सातव्या वेतन आयोगानुसार डिसेंबर महिन्याच्या वेतनात आयोगाच्या फरकानुसार वाढणाऱ्या वेतनाची ५० टक्के रक्कम जमा केली जाणार आहे.
( हेही वाचा : १०० व्या कसोटी सामन्यात २०० धावा! सचिनशी बरोबरी करत वॉर्नरने केले अनेक रेकॉर्ड )
यानंतर जानेवारी २०२३ मध्ये आयोगाबाबत मुख्यमंत्री आणि महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक होऊन सातवा वेतन आयोग लागू केल्यानंतर उर्वरित ५० टक्के वाढीनुसार वेतन देण्यात सुरूवात केली जाणार आहे.
पीएमपी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळावा यासाठी शिवसेना पक्षाचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर पीएमपीमध्ये या मागणीबाबत बैठक घेण्यात आली आणि हा निर्णय झाल्याचे नाना भानगिरे यांनी सांगितले.
पीएमपी कर्मचाऱ्यांच्या आणखी कोणत्या मागण्या मान्य झाल्या?
- पीएमपी कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळावे यासाठी जागा निश्चिक करणे.
- वैद्यकीय बिलांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देणे.
- डेपो परिसरात महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारणे.
- कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन सुरू करण्याची मागणी अशा अनेक मागण्या मान्य करण्यात आल्याचे भानगिरे यांनी स्पष्ट केले आहे.