येत्या 19 नोव्हेंबरपासून राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. या अधिवेशनात राज्यातील इतर प्रश्नांवरुन राजकीय खडाजंगी होणार यात काहीच वाद नाही. पण या अधिवेशनात होणा-या निर्णयाकडे सरकारी कर्मचा-यांचे लक्ष अधिक लागले आहे. या अधिवेशनात राज्य सरकारी कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकडे सरकारचा कल असेल, असे सूत्रांकडून समजत आहे.
या मागण्यांवर निर्णय होण्याची शक्यता
केंद्र सरकारी कर्मचा-यांच्या धरतीवर राज्य सरकारी कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात देखील 4 टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय या अधिवेशनात होण्याची चिन्हे आहेत. तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतही अधिवेशनात चर्चा होऊ शकते, असेही सांगण्यात येत आहे.
(हेही वाचाः सरकारी कर्मचा-यांसाठी धोक्याची घंटा, पेन्शन आणि ग्रॅच्युटीबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय)
कर्मचा-यांचा आंदोलनाचा इशारा
देशातील पाच राज्यांमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही सरकारी कर्मचा-यांकडून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित कर्मचारी महासंघाने देखील राज्य कर्मचा-यांसाठी जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
(हेही वाचाः UTS App मध्ये रेल्वे करणार ‘हा’ बदल! तिकीट, पास काढताना प्रवाशांना होणार मोठा फायदा)
15 नोव्हेंबर पर्यंत राज्य सरकारने राज्य कर्मचा-यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी ठोस पावले उचलली नाहीत तर राज्यभर राज्य कर्मचारी आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community