केंद्रीय कर्मचा-यांसाठी मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. 75व्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात घसघशीत वाढ केली आहे. केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात आता 4 टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचा-यांची गेल्या अनेक काळापासून असलेली प्रतीक्षा आता संपुष्टात आली असून त्यांना दिलासा मिळाला आहे.
एक कोटींहून अधिक कर्मचा-यांना लाभ
जून महिन्यातील एआयसीपीआयचे आकडे समोर आल्यानंतर महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एआयसीपीआयच्या पहिल्या सहामाहीतील आकडे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यानुसार आता नवा आकडा 0.2 पॉईंटच्या वेगासह 129.2 वर पोहोचला आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनर्सना होणार आहे.
(हेही वाचाः RTO चा नवा नियमः लायसन्समधील ही गोष्ट तपासून घ्या, नाहीतर 5 हजार दंड भरा)
या महिन्यापासून लागू होणार डीए
सप्टेंबर 2022 पासून हा महागाई भत्ता लागू करण्यात येणार आहे. तसेच वाढलेला डीए जुलैपासून लागू होणार असून कर्मचा-यांना जुलै आणि ऑगस्टच्या एरियरची रक्कमही मिळणार आहे. डीएमध्ये झालेल्या या 4 टक्के वाढीमुळे केंद्रीय कर्मचा-यांचा एकूण महागाई भत्ता 38 टक्के झाला आहे. यापूर्वी कर्मचा-यांना 4 टक्क्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्यात येत होता.
Join Our WhatsApp Community