मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! लवकरच सुरू होणार सातवे रेल्वे टर्मिनस

145

मुंबई सेंट्रल, सीएसएमटी, दादर, वांद्रे या टर्मिनसवरील लांबपल्ल्याच्या गाड्यांचा भार हलका करण्यासाठी जोगेश्वरीत टर्मिनस बांधण्यात येणार आहे. जोगेश्वरीमध्ये टर्मिनस बांधले गेले तर हे मुंबईतील सातवे टर्मिनस ठरणार आहे. सध्या या टर्मिनसचे रेखाचित्र तयार करण्याचे काम सुरू आहे. टर्मिनस उभारणीचे काम येत्या ८ ते १० महिन्यांमध्ये सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात येत आहे.

( हेही वाचा : कुर्ला ते बीकेसी मार्गावरील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार? होणार सुपरफास्ट प्रवास)

नवे टर्मिनस बांधण्याचा निर्णय 

लांबपल्ल्याच्या गाड्यांचा वाढता भार पाहता आणखी काही टर्मिनसची गरज पडणार असून मध्य रेल्वेवर पनवेलमध्येही टर्मिनसच्या कामाला गती दिली जात आहे. सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई सेंट्रल, वांद्रे येथून मेल-एक्स्प्रेस गाड्या सुटतात. परंतु जागा अपुरी पडत असल्याने मोठ्या प्रमाणाच गर्दी होते. यामुळे पश्चिम रेल्वेवर जोगेश्वरीमध्ये एक टर्मिनस बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जोगेश्वरी टर्मिनससाठी रेखाचित्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे रुळ, फलाट इत्यादी कामे आणि प्रकल्प राबवण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. जोगेश्वरी टर्मिनसचे काम सुरू होण्यासाठी आणखी ८ महिने लागणार आहेत. यासाठी ६८ कोटी ९९ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.