पश्चिम रेल्वेने गणपती विसर्जनासाठी चर्चगेच ते विरार मार्गावर आठ विशेष लोकल चालविण्याचा निर्णय घेतल आहे. चार अप आणि चार डाऊन गणपती स्पेशल गाड्या चालविण्यात येणार असून त्यामुळे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाट्यांवर जाणाऱ्या भक्तांची सोय होणार आहे.
( हेही वाचा : एसटीतील ८०० कंत्राटी चालक बेरोजगार होणार? महामंडळाने घेतला मोठा निर्णय)
उत्सवातील दहा दिवसात ज्या भाविकांना दर्श घेणे शक्य नाही असे भाविक विसर्जनाच्या दिवशी चौपाटीवर येतात या प्रवाशांच्या सुविधेसाटी पश्चिम रेल्वेने लोकल फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकल फेऱ्यांचे वेळापत्रक
- चर्चगेट ते विरार – मध्यरात्री १.१५
- चर्चगेट ते विरार- मध्यरात्री १.५५
- चर्चगेट ते विरार – मध्यरात्री २.२५
- चर्चगेट ते विरार – मध्यरात्री ३.२०
- विरार ते चर्चगेट – रात्री १२.१५
- विरार ते चर्चगेट – रात्री १२.४५
- विरार ते चर्चगेट – रात्री १.४०
- विरार ते चर्चगेट – रात्री ३.००
दरम्यान, पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते गोरेगावदरम्यान रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. ब्लॉक कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत तर काही फेऱ्या विलंबाने धावणार आहेत.
Join Our WhatsApp Community