Mahakumbh साठी निघालेल्या 8 दोस्तांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत ; धावत्या बसचा टायर फुटला आणि …

185
Mahakumbh साठी निघालेल्या 8 दोस्तांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत ; धावत्या बसचा टायर फुटला आणि ...
Mahakumbh साठी निघालेल्या 8 दोस्तांचा भीषण अपघातात दुर्दैवी अंत ; धावत्या बसचा टायर फुटला आणि ...

महाकुंभसाठी (Mahakumbh) निघालेल्या 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. धावत्या बसचा टायर फुटल्यामुळे बस दुभाजकावर पलटी मारून दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारवर आदळल्याने हा भीषण अपघात (accident) झाला. तर, 6 जण जखमी झाले आहेत. राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर (Jaipur-Ajmer Highway) मौखमपुरात हा अपघात गुरुवारी (६ फेब्रुवारी ) झाला. (Mahakumbh)

हेही वाचा-AT4 In Indian Army : भारतीय सशस्त्र दलांत अँटी-आर्मर वेपन सिस्टम AT4 दाखल ; लष्कराची ताकद वाढणार

या भीषण अपघातात इको कारचा (Eco car) चक्काचूर झाला. आत बसलेल्या आठही जणांचा जागीच मृत्यू झाला. कारमधील सर्व लोक भिलवाडा येथील रहिवासी होते. एसपी आनंद कुमार शर्मा म्हणाले की, जोधपूर (Jodhpur) डेपोची रोडवेज बस जयपूरहून अजमेरला जात होती. इको कार अजमेरहून जयपूरच्या दिशेने येत होती. यावेळी अचानक बसचा टायर फुटला. त्यामुळे बसचे नियंत्रण सुटले. बस दुभाजकावरून पलटी होऊन मारून पलीकडून येणाऱ्या कारला धडकली. (Mahakumbh)

हेही वाचा-“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, AK47 हातात घेत Ajit Pawar यांची मिश्किल टिप्पणी

या भीषण अपघातात दिनेश कुमार, सुरेश रेगर, बबलू मेवाडा, जानकीलाल, रविकांत मदनलाल, मुकेश उर्फ ​​बाबू रेगर मुलगा मदनलाल, नारायणलाल बैरवा आणि प्रमोद सुथार यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भीलवाडा जिल्ह्यातील कोत्री भागात राहणारे सर्व लोक महाकुंभासाठी भिलवाडाहून प्रयागराज येथे जात होते. (Mahakumbh)

हेही वाचा-ऐतिहासिक वाघनखे नागपुरात! Devendra Fadnavis यांच्या हस्ते होणार प्रदर्शनाचं उद्घाटन

बडलियास गावचे माजी सरपंच प्रकाश रेगर म्हणाले की, सर्व तरुण मित्र होते. गुरूवारी सकाळी 10:30 वाजता बादलियास (भिलवाडा) येथून प्रयागराज (Prayagraj) महाकुंभासाठी (Mahakumbh) रवाना झाले होते. तीन दिवसांनी गावी परतणार होते. बबलू मेवाडा हे मांडलगड रेल्वे दूरसंचार विभागात नियुक्त होते. काही काळापूर्वी त्यांच्या मोठ्या भावाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला होता. बबल यांना तीन मुली आहेत.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.