मुूंबईला गोवर विळखा, दिवसभरात ‘इतके’ वाढले रुग्ण

100

शनिवारी पालिका आरोग्य विभागाच्या अधिका-यांना गोवंडी तसेच इतर तीन विभागांतून गोवरचे नवे आठ रुग्ण सापडले आहेत. एच पूर्व आणि एम पूर्व विभागात प्रत्येकी ३ तर जी दक्षिण आणि एस विभागातून प्रत्येकी एक रुग्ण पालिका अधिका-यांच्या सर्व्हेक्षणात सापडला. मुंबईत आतापर्यंत १८४ बालकांना गोवरचे रुग्ण सापडले आहेत. संशयित गोवरबाधित रुग्णांच्या आकडेवारीवरुन पालिका अधिका-यांमध्ये असलेल्या गोंधळावर पुन्हा एकदा स्पष्टीकरण देण्यात आले. आतापर्यंत संशयित गोवरच्या रुग्णांची संख्या ९वर पोहोचली असून, भिवंडीतील बालकाचा मृत्यू मुंबईबाहेरील नोंदवला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले.

मुंबईत शनिवारच्या घरोघरी झालेल्या सर्व्हेक्षणात १७६ बालकांना ताप व शरीरावर पूरळ आढळले. ७ सप्टेंबरपासून मुंबईत ३ हजार ३६ संशयित रुग्ण पालिका अधिका-यांना सापडले. एम-पूर्वसह, ई, एफ-उत्तर, जी-उत्तर, एस, एम-पश्चिम, पी-उत्तर आणि एच-पूर्व या भागांत गोवरचे बालक आढळले आहेत. एकूण १७ ठिकाणी उद्रेक झाला आहे. पालिकेच्या गोवरप्रतिबंधात्मक लसीकरणात पालकांनी आपल्या ९ महिने ते पाच वर्षांच्या मुलांना घेऊन यावे, असे आवाहन पालिका आरोग्य विभागाने केले आहे.

(हेही वाचा काँग्रेसने उद्धव ठाकरेंना भरला दम, म्हणाले…)

  • शनिवारी पालिका रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण – ११
  • बरे झालेले रुग्ण – २७
  • रुग्णालयात उपचार सुरु असलेले रुग्ण – ७३
  • रुग्णालयात स्थिर प्रकृती असलेले रुग्ण – ६२
  • ऑक्सिजन उपचारावर असलेले रुग्ण – ९
  • व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण – २
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.