पुण्यात वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 8 पोलिस निलंबित!

पुणे लोहमार्गच्या पुणे रेल्वे पोलिसांनी 2020 मध्ये अमली पदार्थाचे मोठे रॅकेट पकडले होते. या प्रकरणी कारवाईला विलंब केला होता.

125

पुणे शहरात पोलिस निरीक्षकासह ८ पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्रसिंग गौड यांच्यासह पोलिस ठाण्यातील 8 पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. अप्पर पोलिस महासंचालक कार्यालयाकडून हे निलंबन झाले आहे. आरोपींवर तात्काळ कारवाई न करता त्यांना हॉटेलात ठेवले व कारवाईला वेळ घालवला, असा ठपका ठेवत त्यांचे निलंबन केले आहे. या कारवाईने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

अमली पदार्थप्रकरणी कारवाईला विलंब केल्याचा आरोप!

पोलिस निरीक्षक सुरेंद्र गौड, पोलिस शिपाई संतोष विष्णू लाखे, माधव मारुती झेंडे, गणेश अशोक शिंदे, श्रीकांत मार्केंडय बोनाकृती, गंगाधर केशाव, अशोक अकबर गायकवाड आणि कैलास प्रकाश जाधव पोलिस दलातून निलंबन झालेल्यांची नावे आहेत. पुणे लोहमार्गच्या पुणे रेल्वे पोलिसांनी 2020 मध्ये अमली पदार्थाचे मोठे रॅकेट पकडले होते. या प्रकरणी दोघा जणांना पकडले होते. थर्टी फस्टच्या आयोजित पार्ट्यांना हे अमली पदार्थ पुरवले जाणार होते, असे त्यावेळी सांगितले जात होते. यात 1 कोटी 3 लाख रूपयांचा चरस पकडला गेला होता. हिमाचल प्रदेश येथून हे चरस आणले जात होते. डिसेंबर 2020 ला ही कारवाई झाली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, कालांतराने हा गुन्हा तपासासाठी एटीएसकडे वर्ग करण्यात आला. त्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना एटीएसला या आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर तत्काळ गुन्हा दाखल न करता विलंब केला. अंमली पदार्थांसह ताब्यात घेतलेल्या आरोपींवर तत्काळ कारवाई न करता त्यांना काही दिवस पुणे रेल्वे स्टेशन जवळील हॉटेलमध्ये ठेवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा : झाडे पडण्यामागे वादळे निमित्त, वृक्ष रोपणाची पद्धत चुकीची!)

एटीएसच्या चौकशीतून समोर आले!

एटीएसने आरोपींचा ताबा घेत चौकशी सुरू केली. त्यात जबाब घेण्यात आला असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिस निरीक्षक गौड कायम रेल्वे पोलिस दलात वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. काही प्रवाशांना तपास आणि चौकशीच्या नावाखाली अडवून लुटले जात असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. नुकतीच एका राजकीय पक्षाने देखील याबाबत आवाज उठवत तक्रार केली होती.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.