आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) नल्लोरे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी उघडकीस आली आहे. भाग्यश्री नावाच्या एका ८ वर्षीय मुलीला ब्रेन ट्यूमरने (Brain Tumor) ग्रासले होते. त्यामुळे पीडितेच्या पालकांनी तिला दवाखान्यात नेण्याऐवजी चर्चमध्ये नेले. एकूण ४० दिवस पीडितेच्या उपचारासाठी तिचे कुटुंबीय चर्चमध्ये होते. त्यावेळी कुटुंबियांनी तिच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली. मात्र याचा तिळमात्रही उपयोग झाला नाही. अखेर दि. ९ डिसेंबर रोजी पीडित मुलगी अंधश्रद्धेची शिकार ठरली. तिचा चर्चमध्येच दुर्देवी मृत्यू झाला. (Brain Tumor)
( हेही वाचा : Best Bus : खासगी बस चालकांची निष्ठा प्रवाशांऐवजी किलोमीटरशी; माजी विरोधी पक्षनेत्याचा आरोप)
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, बालाजी रावपेट, काळुवई मंडळ (Kaluvai Mandal) येथील एका वसाहतीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला सतत डोकेदुखी आणि उलट्यांचा त्रास होत होता. त्यामुळे उपचारासाठी आई-वडील लक्ष्मय्या आणि लक्ष्मी यांनी तिला उपाचारावेळी नल्लोक आणि तिरूपती येथे अनेक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आई-वडिलांना मुलीची शस्त्रक्रिया परवडत नसल्याने त्यांनी नातेवाईकांची आणि रुग्णालयाची मदत मागितली. (Brain Tumor)
यानंतर, कुटुंबातील काही नातेवाईकांनी उपचारासाठी मुलीला अदुरूपल्ली येथील चर्च येथे पाठवा, असा सल्ला दिला. त्यांचे म्हणणे होते की, देवाला प्रार्थना केल्याने मुलीची तब्येत बरी होईल. त्यावेळी युवतीचे कुटुंब तिला रुग्णालयातून चर्चमध्ये घेऊन गेले. त्यानंतर चर्चममध्ये ४० दिवस आजारी मुलीला ठेवण्यात आले. त्यानंतर तिचा उपचाराअभावी दुर्देवी मृत्यू झाला. (Brain Tumor)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community