आता दोन मिनिटांत पार होणार कशेडी घाट

मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोकणातील सर्वात मोठा घाट ठरलेल्या कशेडी घाटातील बोगद्यांचे काम 80 टक्के पूर्ण झाले असून, आता आतील काॅंक्रीट रस्त्याचे काम बाकी आहे. एकूण 9 किलोमीटरच्या लांबीत 2 किलोमीटरचे समांतर दोन बोगदे वाहतुकीस सुरु करण्याचे नियोजन राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून करण्यात आले आहे. या बोगद्यामुळे सध्याचा पाऊण तासाचा घाट पार करण्यासाठी अवघी दोन मिनिटेच लागणार आहेत.

( हेही वाचा: पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी भारताला डीवचण्यासाठी ट्विट केलं, अन् तेही दुसऱ्याचं चोरून? )

वेळेत कमालीची बचत

  • कशेडी घाटातील 13 किलोमीटर अंतरात अनेक अवघड वळणे आहेत. त्यामुळे खेड ते पोलादपूरच्या दरम्यान तासाभराचा कालावधी लागतो. मात्र, आता या बोगद्यामुळे 4 किलोमीटरचे अंतर वाचणार असून, वेळेची बचतही होणार आहे. अवघ्या दोन ते चार मिनिटात आता बोगदा पार करणे शक्य होणार आहे.
  • कशेडी घाटात ब्लॅक स्पाॅट ठरलेल्या वळणावर वर्षातून सात ते आठ अपघात होतात. पावसाळ्यात दरडी कोसळून महामार्ग बंद राहतो. घाटाच्या चढ आणि उतारात तासाभराचा कालावधी जातो.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here