महाराष्ट्रात ८० हजार हेक्टर पिकांना अवकाळी पावसाचा फटका!

129

राज्यात उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. या पावसामुळे हजारो हेक्टर शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात अवकाळी पावसाचा संत्र्याच्या पिकाला फटका बसला. तर उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये रब्बी पिकांव्यतिरिक्त संत्री, केळी, डाळिंब, द्राक्षे यांच्या लागवडीलाही फटका बसला आहे.

( हेही वाचा : ६ खंड, ४० देश…नऊवारी नेसून दुचाकीवरून जगभ्रमंती करणार ‘भारत की बेटी’! पंतप्रधान म्हणाले… )

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याबाबत माहिती देताना कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्यात अवकाळी पावसामुळे आतापर्यंत 80 हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पीक नुकसानीमुळे प्रभावित झाले आहे. नुकसान तपासण्यासाठी पंचनामे प्रक्रिया अद्याप सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. हवामान खात्याने 25 मार्च रोजी पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या अनेक भागात जवळपास 5 दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांपैकी नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसला आहे. विदर्भात बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये पाऊस आणि गारपिटीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. कांद्याच्या अतिरिक्त साठ्यामुळे फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला भाजीपाल्याची किंमत 1,100 रुपये प्रति क्विंटलवरून 450 रुपये प्रति क्विंटलपर्यंत घसरली होती. राज्य सरकारने कांद्याला 350 रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले असताना विरोधी पक्ष आणि कांदा उत्पादकांनी 500 ते 600 रुपये प्रतिक्विंटलची मागणी केली आहे. दरम्यान राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आठवडाभरात पंचनामे पूर्ण होतील असे सांगितले असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.