कोरोनाचा पुन्हा उद्रेक, ऑस्ट्रेलियात एकाच क्रूझवर आढळले 800 कोरोनाबाधित

देशासह जगभरात कोरोनाचा कहर कमी होत असल्याचे दिसत असतानाच आता कोरोनाच्या उद्रेकाबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रोलियाच्या सीडनी येथील एका क्रूझवर तब्बल 800 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

800 जणांना कोरोनाची लागण

न्यूझीलंडहून परतलेल्या मॅजेस्टिक प्रिन्सेस या हॉलिडे क्रूझमध्ये 4 हजारांहून अधिक प्रवासी होते. या प्रवाशांची कोरोना चाचणी केली असता त्यापैकी 800 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, यानंतर पॉझिटिव्ह रुग्णांना आयोसोलेशन मध्ये राहण्यास सांगितले आहे. तसेच क्रूझवरील प्रवाशांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यासही मनाई करण्यात आली आहे. क्रूझवरील मेडिकल टीम प्रवाशांसोबत असून ती प्रवाशांची योग्य ती काळजी घेत असल्याचे प्रिन्सेस क्रूझने आपल्या निवेदनात म्हटले आहे.

(हेही वाचाः रेल्वे स्टेशनवरील पिचका-या बंद करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची भन्नाट युक्ती)

तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

दरम्यान, याच आठवड्यात न्यू साऊथ वेल्समधील आरोग्य अधिका-यांनी कोरोनाबाबत चिंता व्यक्त केली होती. कोरोना रुग्णांचा आलेख हा सध्या झपाट्याने वाढत असून, कोरोना महामारीची नवी लाट जाणवू शकते, असा इशारा अधिका-यांनी दिला होता. तसेच आगामी सुट्ट्यांच्या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार असल्याचा अंदाजही ऑस्ट्रेलियातील काही वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केला होता.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here