सामाजिक न्याय विभागाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजने अंतर्गत (Mukhyamantri Tirth Darshan Yojana) मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे या जिल्हयातील 800 ज्येष्ठ नागरिक 4 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येसाठी विशेष ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) सीएसटी येथून रवाना होणार आहेत.
(हेही वाचा – Road Cement Concreting : आयआयटी आणि महापालिकेच्या अभियंत्यांमध्ये सुसंवाद ठेवा, महापालिका आयुक्तांचे निर्देश)
राज्यातील सर्व धर्मीयांमधील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पुर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना (Mukhyamantri Tirth Darshan Yojana) सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये भारतातील एकूण 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थस्थळांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत मुंबई विभागातील मुंबई शहर या जिल्ह्यातून 150, मुंबई उपनगर या जिल्ह्यातून 306 व ठाणे जिल्ह्यातून 471 इतके अर्ज अयोध्येला जाण्यासाठी प्राप्त झाले आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यातील मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या जिल्ह्यातून 800 ज्येष्ठ नागरिक अयोध्येसाठी जाणार आहेत.
(हेही वाचा – Pollution : प्रदूषण जागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी राज्यात शहाणपण देगा देवा मोहीम)
यासाठी सदर विशेष ट्रेन 04 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 01:30 वाजता मुंबई येथून रवाना होईल व 08 ऑक्टोबर 2024 रोजी अयोध्येतून मुंबईला परत येईल. सदर योजनेसाठी उत्पनाची अट 2.5 लाख आहे. वैद्यकीय दाखला, वयाची 60 वर्ष पूर्ण इ. अटी आहेत. या योजनेअंतर्गत (Mukhyamantri Tirth Darshan Yojana) मुंबई विभागातून ज्येष्ठ नागरिकांचे दिक्षाभूमी नागपूर, अजमेर, महाबोधी मंदीर गया, शेगाव, पंढरपूर इ. साठी मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हयातून एकूण 2505 अर्ज प्राप्त झाले आहेत. यासंबंधी नियोजन सुरू आहे. तरी, ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण या कार्यालयांशी संपर्क साधावा. असे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community