निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पासाठी व्यापलेला ८४ किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी केला खुला

247
निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पासाठी व्यापलेला ८४ किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी केला खुला
निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पासाठी व्यापलेला ८४ किमी लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी केला खुला
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मान्सून दरम्यान रस्त्यावरील वाहतुककोंडी कमी करून नागरिकांना दिलासा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर रिजन) निर्माणाधीन मेट्रो प्रकल्पातील उन्नत मार्गाचे काम जिथे जिथे झाले आहे तेथील बॅरिकेड्स काढण्याचा निर्णय घेतला आहे. ६ मेट्रो प्रकल्पातील एकुण ३३, ९२२ बॅरिकेड्स काढल्याने दुतर्फा ८४.८०६ (४२ किमी एकेरी रस्ता) किमी. लांबीचा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला आहे. मुंबई महानगर प्रदेशात सुमारे ३३७ किमी लांब मेट्रोचे जाळे प्राधिकरणामार्फत उभारण्यात येत आहे. त्यापैकी मेट्रो मार्ग २ब, ४, ४अ, ५, ६, ७अ आणि ९ या मेट्रो मार्गांसाठी लावण्यात आलेल्या बॅरिकेड्सपैकी सुमारे ६० टक्के बॅरिकेड्स हटवण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा प्रत्येकी १-१ मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध झाली आहे.
महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, भा.प्र.से. यांनी मुंबई महानगर प्रदेशात प्रगतीपथावर असलेल्या सर्व मेट्रो प्रकल्पातील काम पूर्ण झालेल्या ठिकाणचे बॅरिकेड्स काढून रस्ते पूर्वस्थितीत खुले करण्याचे निर्देश दिल्यानंतर अनेक महत्वाच्या रस्त्याचा भाग मोकळा झाल्याने मान्सून दरम्यान नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग, बीकेसी, एस. व्हि.रोड, वी.एन. पुरव मार्ग (चेंबूर नाका), न्यू लिंक रोड, गुलमोहर रोड, एम जी रोड, घोडबंदर रोड, कापूरबावडी, बाळकुम, दहिसर, मिरारोड, भाईंदर, ठाणे, तीन हात नाका, जेव्हिएलआर, इन्फिनिटी मॉल, पवई, कांजूरमार्ग, मानखुर्द या भागातील प्रगतीपथावर असलेल्या मेट्रो मार्गांवरील हे बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत. ज्यामुळे प्रकल्पाच्या दोन्ही बाजूची १-१ मार्गिका वाहतुकीसाठी मोकळी करून नागरिकांना अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.
“देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरु आहेत. बांधकामादरम्यान मुंबईकरांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून प्रकल्पाच्या ठिकाणी विशिष्ट जागा बॅरिकेड्सने प्रतिबंधित करावी लागते. ज्यामुळे रस्त्याचा काही भाग हा प्रकल्प होईपर्यंत मुंबईकरांना वापरता येत नाही. म्हणूनच मुंबई मेट्रो प्रकल्पातील ज्या ज्या टप्प्यातील कामे झाली आहेत अशा ठिकाणचे अडथळे काढुन तो रस्ता मुंबईकरांसाठी खुला करण्यात आला आहे. अवघ्या महिन्याभरात प्राधिकरण्याच्या कर्मचाऱ्यांनी ३० हजाराहून अधिक बॅरिकेड्स काढले आहेत. दर १५ दिवसांनी मेट्रोच्या कामाचा आणि बॅरिकेड्सचा आढावा घेतला जाईल. आणि एखाद्या ठिकाणी काम संपले की लगेचच तो रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन दिला जाईल. तसेच रस्त्यांलगतचे सर्व बॅरिकेड्स (barricades) कमीत कमी जागेत लावून जास्तीत जास्त रस्ता रहदारी साठी मोकळा ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत” अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त, डॉ. संजय मुखर्जी, भाप्रसे यांनी दिली.”

बॅरिकेड्स हटवण्यात आलेल्या काही रस्त्यांचा तपशील

मेट्रो मार्ग २ब
गुलमोहर रोड (जुहू सर्कल ते मिठीबाई महाविद्यालय) १.७६७ किमी
एस.व्ही. रोड (विले पार्ले जंक्शन ते मिलन सबवे)
१.०५७ किमी
बी.के.सी रोड (कलानगर ते MTNL)
१.५३६ किमी
वि.एन. पूर्व मार्ग (डायमंड गार्डन ते BARC फ्लायओव्हर)
१.४०८ किमी
सायन- पनवेल हायवे o(BARC फ्लायओव्हर ते मानखुर्द फ्लायओव्हर)
१.४५९ किमी
मेट्रो मार्ग ४आणि ४अ
९० फिट रोड
३.९९० किमी
एल.बी. एस मार्ग (वेगवेगळ्या तीन ठिकाणी)
१५ किमी
ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे
४.७२६ किमी
घोडबंदर रोड (वेगवेगळ्या दोन ठिकाणी)
४किमी
डेपो रोड
१.१५४किमी
मेट्रो मार्ग ५
कापूरबावडी ते बाळकुम नाका
१.५५३ किमी
बाळकुम नाका ते अंजूरफाटा
७.५७३ किमी
अंजूरफाटा ते धामणकर नाका
२.०३३ किमी
मेट्रो मार्ग ६
JVLR (WEH जंक्शन ते महाकाली लेणी)
४.३० किमी
 JVLR (महाकाली लेणी ते पवई तलाव)
४.१९किमी
JVLR (पवई तलाव- विक्रोळी – EEH वर कांजूर मार्ग डेपो)
६.५ किमी
मेट्रो मार्ग ९
ओवारीपाडा जंक्शन ते दहिसर टोल
१.६४८ किमी
दहिसर टोल ते डेल्टा
१.७१० किमी
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.