महिलांच्या नावावर सर्वाधिक घरांची नोंदणी
राज्ये, केंद्रशासित प्रदेशांनी प्रधान मंत्री आवास योजना – शहरी (पीएमएवाय-यू) अंतर्गत दिलेल्या प्रस्तावांनुसार, आजवर केंद्रीय सहाय्याचे 2 लाख कोटी रुपये धरून एकूण 8.07 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह 118.64 लाख घरांना मंत्रालयाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यातील 114.40 लाख घरांची पायाभरणी झाली आहे आणि 85.43 लाख घरे पूर्ण बांधून लाभार्थ्यांना देऊन झाली आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली.
राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि प्राथमिक पत संस्था (पीएलआय) यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 16.79 लाख, 49.63 लाख आणि 39.44 लाख घरांची अनुक्रमे पुरुष, महिला आणि संयुक्त मालकीअंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. म्हणजेच 89 लाखांहून अधिक घरांची महिलेच्या नावे किंवा संयुक्तरित्या नोंदणी झाली आहे. केंद्राकडून या योजनेअंतर्गत देण्यात आलेल्या 2 लाख कोटी रुपयांपैकी 1.64 लाख कोटी रुपये राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मध्यवर्ती विभागांना जारी करण्यात आले आहेत. (PM Awas Yojana)
(हेही वाचा – लोकसभेतील पराभवानंतर Ajit Pawar बारामतीत; कार्यकर्त्यांना म्हणाले, सगळ्यांनी राजीनामा द्यावेत)
जमीन आणि वसाहती हा राज्याच्या अखत्यारितील विषय आहे. त्यामुळे नागरिकांसाठी गृहनिर्माणाच्या योजनांवर अंमलबजावणी राज्ये, केंद्रशासित प्रदेशांकडून केली जाते. या कामी राज्ये/केंद्रशासित प्रदेश करत असलेल्या प्रयत्नांना केंद्रीय सहाय्य देण्यासाठी गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने 25 जून 2015 पासून देशातील शहरांमधील पात्र लाभार्थ्यांना प्राथमिक सोयीसुविधा असलेली पक्की घरे बांधून देण्यासाठी पीएमएवाय-यू सुरू केली.
(हेही वाचा – Water Supply : जुलैच्या सुरुवातीला निम्म्यावर आलेला जलसाठा आता मागील दोन वर्षांच्या तुलनेत सर्वांधिक)
पात्र लाभार्थी कुटुंबांची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने 3 कोटी अतिरिक्त ग्रामीण व शहरी घरांच्या बांधकामांसाठी मदत देण्याचा निर्णय 10 जून 2024 रोजी जाहीर केला. 2024-25 च्या अर्थसंकल्पानुसार, पीएमएवाय-यू 2.0 द्वारे 1 कोटी शहरी गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांच्या गृहनिर्माणासाठी केंद्राच्या 2.20 लाख कोटी केंद्रीय अर्थसहाय्याधारे 10 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे. (PM Awas Yojana)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community