देशात लवकर 85 नवीन केंद्रीय आणि 28 नवोदय विद्यालये सुरू केली जाणार आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet) शुक्रवारी झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याचे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
(हेही वाचा – Dharavi Project : धारावीत सन २०११नंतरच्या रहिवाशांना भाडेतत्वावरील घरे)
यासंदर्भात वैष्णव यांनी सांगितले की, देशात 85 नवीन केंद्रीय आणि 28 नवीन नवोदय विद्यालये उघडण्यात येणार आहेत. नवोदय विद्यालय योजनेत समाविष्ट नसलेल्या जिल्ह्यांमध्ये या शाळा सुरू केल्या जातील. नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी पंतप्रधान सर्व केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालये पीएम श्री योजना सुरू करण्यात आली आली आहे. जेणेकरून त्यांना मॉडेल बनवता येईल. याशिवाय हरियाणाशी संपर्क वाढवण्यासाठी दिल्ली मेट्रोच्या 26.46 किलोमीटर लांबीच्या रिठाला-कुंडली कॉरिडॉरला बैठकीत (Union Cabinet) मान्यता देण्यात आली.
(हेही वाचा – बिल्डरची मनमानी, Mumbai High Court चे राज्य सरकारला निर्देश; म्हणाले, राहिवाशांचे प्रश्न…)
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी पीएम सर्व केंद्रीय विद्यालये आणि नवोदय विद्यालये पीएम श्री सुरू करण्यात आली आहेत. जेणेकरून त्यांना मॉडेल बनवता येईल. नवीन केंद्रीय विद्यालये सुरू झाल्याने देशभरातील 82 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना परवडणारे आणि उच्च दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळणार आहे. सध्या 1256 कार्यरत केंद्रीय विद्यालये आहेत. त्यातील तिघे परदेशात आहेत. यामध्ये मॉस्को, काठमांडू आणि तेहरानचा समावेश आहे. या शाळांमध्ये 13.56 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. (Union Cabinet)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community