पुणे महापालिकेत ४४८ पदांसाठी भरती केली जाणार असून यासाठी अर्ज करण्याची मुदत संपली. भरती प्रक्रियेसाठी एकूण ८७ हजार ४७१ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. सर्वाधिक लिपिक पदासाठी ६३ हजार ९४८ उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
( हेही वाचा : तुमचाही स्मार्टफोन हरवलाय? ‘बेस्ट’ने जारी केली गहाळ झालेल्या फोनची यादी! )
पुणे महापालिकेच्या भरतीसाठी तब्बल ८७ हजार अर्ज
महापालिकेतील रिक्त जागा भरण्यासाठी पहिल्या टप्प्यात ४४८ पदांची भरती करण्यासाठी महापालिकेने जाहिरात काढली. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १३५, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) ५, कनिष्ठ अभियंता (वाहतूक नियोजन) ४, सहाय्यक अतिक्रमण निरिक्षक १००, लिपिक २०० लिपिक आणि सहाय्यक विधी अधिकारी ४ यांची सरळसेवेने भरले जाणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी १० ऑगस्ट पर्यंत मुदत होती. ही अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर आता आयबीपीएस या संस्थेकडून महापालिकेला अंतिम अर्जांची माहिती सादर करण्यात आलेली आहे.
यात एकूण ९३ हजार ९९१ उमेदवारांनी अर्जासाठी नोंदणी केली, यापैकी ८७ हजार ४७१ जणांनी परीक्षा शुल्क भरल्याने त्यांचे अर्ज अंतिम झाले आहेत.
Join Our WhatsApp Community