इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या स्पर्धेला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागाने अंगणवाड्यांचे रूप बदलण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना यश आले. जिल्ह्यातील ८९ अंगणवाड्यांना स्मार्ट आनंदवाड्या बनल्या आहेत. इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे जाणारे विद्यार्थी पुन्हा मराठी शाळेत यावेत, यासाठी अंगणवाड्यांची सुधारणा केली जात आहे.
या सुविधा दिल्या जाणार
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने अंगणवाड्यांचे रूप बदलण्यासाठी कार्यवाही हाती घेतली. त्यावेळी अंगणवाड्यांची नुसतीच रंगरंगोटी करण्याऐवजी मुलांना अंगणवाडीत यावेसे वाटावे आणि पालकांनाही मुलांना पाठवावेसे वाटावे, ही संकल्पना ठेवून अंगणवाड्यांचा चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे, असे महिला व बालकल्याण विभागामार्फत सांगण्यात आले. याअंतर्गत एलईडी टीव्ही, सोलर लायटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर, स्वच्छ भारत किट, वॉटर प्युरिफायर, हँडवॉश बेसीन, एज्युकेशनल पेंटिंग चार्टस आदी साहित्य दिले जात आहे. तसेच अंगणवाडी केंद्राची किरकोळ डागडुजी आणि दुरुस्तीदेखील करण्यात आली आहे. त्यामुळे अंगणवाड्या आकर्षक बनल्या आहेत. लहान मुलांना आकर्षित करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.
(हेही वाचा धक्कादायक! मुली शाळेत जाण्यासाठी उतरतात कोयना धरणात)
Join Our WhatsApp Community