मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांमध्ये सध्या १ कोटी २८ हजार ९४३ कोटी लिटर अर्थात १२ लाख ८९ हजार ४३५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. सर्व तलावांमधील एकूण पाणी साठ्याच्या ८९ टक्के एवढा पाणी साठा जमा झाला आहे. ५ जुलै २०२२ यासर्व तलावांमध्ये १४.८० टक्के एवढा पाणी साठा होता. त्यामुळे अवघ्या २० दिवसांमध्ये यासर्व तलावांमध्ये ७४. २९ टक्के एवढा पाणी साठा वाढला आहे. त्यामुळे जुलै महिन्यातच ९० टक्के पाणी साठा जमा झाल्याने भविष्यात पाऊस पडल्यास आणि न पडल्यास मुंबईसह राज्यातील विविध गावांमधील चिंतेत भर पडणारी आहे.
( हेही वाचा : पर्यटन मंत्रालयाशी संबंधित ५९६ कोटींच्या कामांना स्थगिती )
भातसा धरणाची पाण्याची पातळी वाढली
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व तलाव परिसरात मुसळधार पाऊस होत असून मोडकसागर, तानसा, तुळशी या तलावांबरोबरच सर्वांत जास्त पाण्याचा पुरवठा होणाऱ्या भातसा धरणाची पाण्याची पातळी वाढल्याने रविवारी पाच गेट उघडण्यात आले आहे.
सर्वात जास्त पाऊस पडल्याने तुळशी तलावांमध्ये ८०४ कोटी लिटर, तर भातसा धरणातील एकूण ७१ हजार ७०३ कोटी लिटरच्या तुलनेत ६१ हजार ८९५ कोटी लिटर एवढा पाणी साठा जमा झाला आहे. तर मोडक सागर तलावांत १२ हजार ८९२ दशलक्ष लिटर आणि तानसा तलावांत – १४ हजार ४३५ कोटी लिटर इतका पाणीसाठा जमा झाला आहे. सात तलावातील एकूण पाणीसाठा १ लाख २८ हजार ९४३ कोटी लिटर (१२ लाख ८९ हजार ४३५ दशलक्ष लिटर) एवढा पाणी साठा जमा झाला आहे.
८९ टक्के पाणीसाठा
मुंबईला दररोज ३ हजार ८५० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही तलावांत मिळून १ लाख ४ ४ हजार ७ ३६ कोटी लिटर एवढ्या पाणीसाठयाची आवश्यकता असते. त्या तुलनेत मागील ५ जुलै २०२२पासून पाणी साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. ५ जुलै रोजी या सर्व तलावांमध्ये १४.८० टक्के एवढा पाणी साठा होता. परंतु २५ जुलै रोजी हा पाणी साठा ८९.०९ टक्के एवढा पाणी साठा झाला आहे. त्यामुळे २० दिवसांमध्ये ७४.२९ टक्के एवढा पाणी साठा वाढल्याचे दिसून येत आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सर्वांत कमी पाण्याची पातळी असलेला पाण्याचा साठा आता ८९ टक्के पाणीसाठा जमा झाल्याने मुंबईकरांसह राज्यातील अनेक गावांसाठी चिंतेची बाब ठरणार आहे.
मुंबईचा वर्षभराचा पाणी साठा हा १ ऑक्टोबरच्या पाणीसाठ्यावर अवलंबून असतो. त्यामुळे जुलै महिन्यातच पाण्याचा साठा ८९ टक्के जमा झाल्याने भविष्यात पावसाचा जोर कायम राहिल्यास या धरण आणि तलावांमधील पाण्याचे दरवाजे उघडावे लागणार आहे. त्यामुळे या सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे अनेक गावांना धोका निर्माण होऊ शकतो. तसेच भविष्यात पाऊस न पडल्यास तलावामधील पाण्याची पातळी घटली जावू शकते. परिणामी मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यात अनेक अडचणी येवू शकतात. त्यामुळे तलाव परिसरात पुढील काही दिवस पाण्याची पातळी समपातळीत राहण्यासाठी पाऊसाची हजेरी अधून मधून लागणे आवश्यक आहे. त्यामुळे जाणकरांच्या म्हणण्यानुसार, पुढील काही दिवस मुसळधार पाऊस न पडता सप्टेंबर महिन्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे.
Join Our WhatsApp Community