8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याच्या मागणीला जोर

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाची स्थापना झाली तर सरकारी कर्मचाऱ्यांना पगारवाढीची गुड न्यूज मिळू शकते.

583
8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याच्या मागणीला जोर
  • ऋजुता लुकतुके

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांचा पगार आता पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता आहे. कारण आता आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची मागणी जोर धरत आहे. नुकतेच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता ५० टक्क्यांनी वाढवून देण्यात आला आहे. डीए ५० टक्क्यांनी वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या अन्य भत्त्यांतही वाढ झालेली आहे. असे असताना आता वेतन, अन्य भत्त्यांच्या वाढीची शिफारस करणाऱ्या आठव्या वेतन आयोगीच लवकरात लवकर स्थापना करावी, अशी मागणी केली जात आहे. (8th Pay Commission)

इकोनॉमिक्स टाईम्सच्या एका रिपोर्टनुसार जॉइन्ट कन्सल्टिव्ह मशिनरी फॉर सेन्ट्रल गव्हर्नमेंट एम्पलॉईजच्या राष्ट्रीय परिषदेचे सचिन शिव गोपाल मिश्रा यांनी भारत सरकारच्या कॅबिनेट सचिवांना एक पत्र लिहिले आहे. लवकरात लवकर आठव्या वेतन आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. सातव्या वेतन आयोगाची स्थापना होऊन दहा वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. सामान्यत: प्रत्येक दहा वर्षांनी नव्या वेतन आयोगाची स्थापना केली जाते. त्यामुळे आता नव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याची गरज आहे, असे मत मिश्रा यांनी मांडले आहे. (8th Pay Commission)

(हेही वाचा – Bihar Reservation: बिहारमधील वाढीव 65 टक्के आरक्षण हायकोर्टातून रद्द)

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २८ फेब्रुवारी २०१४ रोजी सातव्या वेतन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने साधारण दीड वर्षांनंतर आपल्या शिफारसी सरकारला दिल्या होत्या. त्यानंतर १ जानेवारी २०१६ पासून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात आल्या होत्या. (8th Pay Commission)

सातव्या वेतन आयोगाला या वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. १० वर्षांच्या अंतराचा हिशोब लक्षात घेता आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडे जानेवारी २०२६ पर्यंतचा वेळ आहे. त्यामुळे केंद्र सरकारने लवकरात लवकर आठव्या वेतन आयोगाची स्थापना करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. वेतन आयोगाकडून केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा पगार, माजी कर्मचाऱ्यांचे पेन्शन ठरवले जाते. महागाई तसेच अन्य घटक तपासून याबाबतची शिफारस केली जाते. या वेतन आयोगाकडूनच महागाई भत्ता, अन्य भत्ता आदी ठरवले जाते. (8th Pay Commission)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.