8th Pay Commission: आता आठव्या वेतन आयोगाचे केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेध

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आता १८ महिन्यांच्या वाढीव डीएपेक्षाही मोठी बातमी आहे. संघटनांमध्ये आठव्या वेतन आयोगाचे कर्मचाऱ्यांना वेध लागले आहे. सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झालेल्या असताना आता मोठ्या पगारवाढीचे स्वप्न या संघटना पाहू लागल्या आहेत. इतकेच नाही तर संघटनांमध्ये या आठव्या वेतन आयोगाचे वारे देखील वाहू लागले आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जेवढ्या शिफारसी सातव्या वेतन आयोगात सुचविण्यात आल्यात त्यापैकी कमीच शिफारसी लागू करण्यात आल्याचा आरोप केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या संघटना करत आहेत. या आरोपादरम्यान, हे कर्मचारी आता आठव्या वेतन आयोगाची मागणी करत आहेत.

(हेही वाचा – एलॉन मस्कला ‘त्या’ निर्णयाचा होतोय पश्चाताप! ट्विट करून म्हटले…)

दरम्यान, कर्मचारी संघटनांकडून याबाबत माहिती देण्यात आली असून यासंदर्भात निवेदन तयार करण्यात येत आहे. हे निवेदन लवकरच केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. शिफारशींनुसार पगार वाढवा किंवा ८ वा वेतन आयोग आणावा, अशी मागणी या निवेदनामार्फत कर्मचाऱ्यांकडून करण्यात येणार आहे. मात्र सरकारने आधीच लोकसभेत आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत कोणताही विचार करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. या नकारानंतरही सरकार यावर चर्चा करेल अशी आशा कर्मचाऱ्यांना वाटत आहे.

सातव्या वेतन आयोगानंतर नवा वेतन आयोग येणार नसल्याचे सांगितले जात असताना त्याऐवजी सरकार अशी यंत्रणा राबविण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात आपोआप वाढ होईल. महागाई भत्ता ५० टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पगारात आपोआप वाढ होणार आहे. असे जर झाले तर ६८ लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि ५२ लाख पेन्शनधारकांना त्यांचा आपोआप थेट फायदा होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here